सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला धक्का; डान्स बार'मधली छमछम सुरु होणार

नवी दिल्ली: राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने डान्स बारसाठी घालून दिलेली नियमावली सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालात रद्द केले आहे. त्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा डान्स बारमधील छमछम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमांविरोधात अनेक डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
त्यामुळे आजचा निर्णय राज्य सरकारसाठी धक्का असल्याचं मानलं जात आहे. सुप्रीम कोर्टाने काही ठराविक अटींच्या आधारे बार सुरू करण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. याआधी कोर्टाने या संबंधित निकाल राखून ठेवला होता. महाराष्ट्र सरकारनं डान्स बार संदर्भात केलेल्या कायद्याची माहिती सुनावणी दरम्यान कोर्टाला दिली होती. दरम्यान, राज्य सरकारच्या अटींमुळे आणि या कायद्यामुळे अनेक बेकायदा गोष्टी आणि स्त्रियांचे शोषण रोखता येत असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आला. परंतु ते सर्व नियम कोर्टाने अखेर रद्द केले आहेत.
कोर्टातील सुनावणी दरम्यानचे ठळक मुद्दे;
- बार डान्सर्सना वेगळी टिप दिली जाऊ शकत नाही. त्यांच्यावर पैसेही उधळता येणार नाहीत.
- अश्लिल नृत्यावरील बंदी न्यायालयाकडून कायम
- बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळा ठेवण्याचा नियम रद्द
- डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम रद्द
- मुंबईत रात्री ११.३० पर्यंत डान्स बार सुरू ठेवण्यास परवानगी
- डान्स बारमध्ये अश्लिलला नको
Mumbai Dance bar matter: Supreme Court relaxes stringent conditions set by Maharashtra government for getting licences for running dance bars and upheld the time of five and half hours for dance performances. pic.twitter.com/VokxHV8Ab0
— ANI (@ANI) January 17, 2019
Mumbai Dance bar matter: Supreme Court allows orchestra, tips can be given but showering of cash and coins is not allowed inside bars. https://t.co/TRGjshwE5U
— ANI (@ANI) January 17, 2019
Supreme Court says,”there cannot be total prohibition on dance bars. No licence has been granted by Maharashtra since 2005. There may be regulations but that should not amount to total prohibition.”
— ANI (@ANI) January 17, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं