सवर्ण आरक्षणाला स्थगिती नाही, परंतु केंद्राला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस

नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे केंद्राला लोकसभा निवडणुकीआधी मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, सदर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटिसला उत्तर देण्यासाठी कोर्टाने केंद्राला ४ आठवड्यांचा कालावधी दिली आहे.
मोदी सरकारनं सवर्णांना दहा टक्के आरक्षण देणारं विधेयक संसदेत मंजूर करुन घेतलं. परंतु, याविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका कोर्टाने स्वीकारली असून केंद्राला त्यासंदर्भात नोटीसदेखील बजावली आहे. परंतु, सदर याप्रकरणी कोर्टाने सरकारला दिलासा सुद्धा दिला आहे. दरम्यान, या आरक्षणाला ताबडतोब स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे केली होती. परंतु, कोर्टाने स्पष्ट नकार दिला. तसेच आम्ही या प्रकरणातले सर्व तपशील तपासून पाहू, असं सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या खंडपीठानं यावरील सुनावणी दरम्यान म्हटल्याचे वृत्त आहे.
Supreme Court issues notice to Centre on pleas challenging the constitutional amendment that gives 10 per cent reservation in jobs and education for economically weaker section of the general category. pic.twitter.com/4IlZnkT4RT
— ANI (@ANI) January 25, 2019
Supreme Court issues notice to Centre on pleas challenging the constitutional amendment that gives 10 per cent reservation in jobs and education for economically weaker section of the general category. pic.twitter.com/4IlZnkT4RT
— ANI (@ANI) January 25, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं