तनुश्रीच्या आडून दिल्लीश्वरांचा नाना पाटेकर आणि मनसे विरुद्ध सापळा? सविस्तर

मुंबई : झूम वाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर तनुश्रीने पुन्हा प्रसार माध्यमांसमोर नाना पाटेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ज्या भाषेत प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून तरी तिचे बोलविते धनी दुसरेच कोणी असून सर्व काही सिनेमाप्रमाणे स्क्रिप्टेड (ठरवून) असल्याची कुजबुज प्रसार माध्यमांमध्ये रंगली आहे. सध्या तनुश्रीच्या आरोपांकडे बिग बॉसच्या प्रवेशासाठीचा स्टंट इतकं मर्यादित बघितलं जात असलं तरी पडद्या मागील वास्तव खूप मोठं आहे. तिच्या सोबत जर काही चुकीची घटना घडली असेल तर तिने तो न्यायालयीन प्रक्रियेनुसार सोडवला पाहिजे. परंतु तिने स्वतःच भारतातील न्यायालयांवर अविश्वास दाखवला आहे. अगदी ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाचा वाद त्यात राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे संदर्भहीन विषय तिच्या पत्रकार परिषदेत आले कसे अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपच्या हातून निसटलेल्या पाणी फाऊंडेशन तसेच ‘अक्षय कुमार’ राजकारणाशी त्याचा थेट संबंध जोडला जात आहे.
तनुश्री आणि तिच्या इतिहासावर तर बोलूच, पण त्याआधी भाजपच्या अडचणींचा विषय समजून घेऊ. तसेच प्रसार माध्यमांमध्ये ही चर्चा किंवा कुजबुज खरी रंगली ती तिच्या विखारी पत्रकार परिषदेनंतर आणि त्यामुळेच थोडं मागे जाणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारची ग्रामीण भागातील “जलयुक्त शिवार योजना” किती फलदायी झाली ते वेगळं सांगायला नको, परंतु, त्यातुलनेत अमीर खानची “पाणी फाउंडेशन” खूप फलदायी तर ठरली आणि तितकीच ती राज्यातील गावखेड्यात सुद्धा पोहोचली. अर्थात काम कोणाचं ही असो त्याचा फायदा उचलण्यात सध्याचे भाजप सरकार चतुर आहे.
आता हीच भाजपची काही महिन्यांपूर्वीची ‘जलयुक्त शिवारची योजना’ आणि त्यावरील चित्रित केलेली जाहिरात बघा. जाहिरात आहे राज्य सरकारच्या ‘जलयुक्त शिवार योजनेची” परंतु कामं अमीर खानच्या “पाणी फाउंडेशनची” दाखविण्यात आली आहेत, अगदी पाणी फाउंडेशनच नाव सुद्धा त्या जाहिरातीत दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी ती जाहिरात ट्विट करत त्या योजनेचा “चमत्कार” बघा म्हटलं आणि काही वेळातच सगळं पितळ उघडं पडलं. परंतु काही दिवसांपूर्वी पाणी फाऊन्डेशनचं जे तिसरं पर्व पार पडलं, त्यात अमीर खानाने सर्वच पक्षांना निमंत्रित केलं आणि सगळा खेळ फसला. त्यातही उपस्थितांनी मनसे अध्यक्षांना दाद दिल्याने पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमाची प्रसार माध्यमांवर चर्चा रंगली ती सुद्धा राज ठाकरे यांच्यावर असं चित्र होतं.
त्यात भाजपच्या अक्षय कुमार राजकारणाचं गणित आणि पुरावे इथे संपूर्ण वाचा : https://goo.gl/p6yc19
परंतु नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच “नाम फाउंडेशन” राजकारणापासून दूर राहून राज्याच्या ग्रामीण भागात उत्तम काम करत आहे. त्यात ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहीद जवानांच्या विधवा पत्नी तसेच कुटुंबियांसाठी नाम फाउंडेशनचं भरीव योगदान आहे. त्यासाठी समाजातील अनेकांनी आर्थिक मदत तसेच साहित्य योगदान म्हणून दिलं होतं. राज ठाकरे यांनी नाम फाऊंडेशनला दिलेल्या आर्थिक मदतीची कधीही सार्वजनिक रित्या वाच्यता केली नव्हती. परंतु नाम फाउंडेशनसाठी आर्थिक मदत करणाऱ्या राजकारण्यांमध्ये राज ठाकरे यांचं नाव नाना पाटेकरांनी अनेक प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होत.
त्यानंतर काही महिन्यांपूर्वी नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अनधिकृत फेरीवाला हटवण्यावरून शाब्दिक खटके उडाले होते, परंतु दोघांनी सुद्धा एकमेकांवर वैयक्तिक आणि विखारी टीका केली नव्हती. नंतर नानाच्या एका नवीन सिनेमाच्या रिलीज दरम्यान राज माझा सिनेमा आवर्जून बघणार असं म्हणत नाना पाटेकरांनी राज ठाकरेंसोबत पुन्हा जुळवून घेतलं. परंतु मध्यंतरी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे आगामी निवडणुकीत मनसेसाठी प्रचार करणार असल्याचे वृत्त पसरलं आणि कदाचित ते मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे ज्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.
त्यामुळे आधीच पाणी फाउंडेशन हातातून गेलं आणि त्यात अक्षय कुमारवर केलेलं ब्रॅंडिंग सुद्धा राज ठाकरेंच्या टीकेने वाया गेलं अशी भाजपची राजकीय अडचण झाली. आधीच राज्यात भाजपवर शिस्तबद्ध राजकीय प्रहार करणारे राज ठाकरे आगामी निवडणुकीत इतर पक्षांपेक्षा उजवे ठरतील अशी भीती खुद्द भाजपला आहे. त्यात अजून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे अशी ग्रामीण भागात घराघरात पोहोचलेली व्यक्तिमत्व जर राज ठाकरेंना जाऊन मिळाली तर राज्य भाजप पुरतं गोत्यात येण्याची शक्यता आहे. त्यात अजून भर म्हणजे निवडणुकीदरम्यान विरोधक उन्नाव बलात्कार प्रकरण, कठुआ बलात्कार प्रकरण तसेच राम कदमांचे महिलांप्रती विधान हे सर्व मुद्दे प्रचारादरम्यान बाहेर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या राज्यातील बॅकफूटवर असलेल्या पक्षांपेक्षा मनसेला टार्गेट करून नाना पाटेकरांना सुद्धा निवडणुकीआधी बदनाम करण्याचं षडयंत्र तनुश्री दत्ताच्या माध्यमातून सत्ताधारी धुरंदर आखत असल्याची कुजबुज प्रसार माध्यमांमध्ये रंगली आहे. त्यासाठीच हे १० वर्षांपूर्वीच प्रकरण उकरून तिला शिस्तबद्ध स्क्रिप्टेड (ठरवून) काही तरी सांगितलं जात आहे आणि त्यात नाना पाटेकर आणि राज ठाकरे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. तिच्या आरोपात तथ्य असेल तर तिने न्यायालयात धाव घेण्याऐवजी रोज नवनवीन विखारी टीका करून स्वतःची विश्वासाहर्ता कमी केली आहे.
आता १० वर्षानंतर भारतात परतलेली तनुश्री दत्ता सध्या नव्या सिनेमांच्या शोधात आहे. आता हीच तनुश्री दत्ताची एक महिन्यापूर्वीची मुलाखत बघा, म्हणजे नाना पाटेकरांवर आरोप करण्यापूर्वीची ही मुलाखत आहे. त्यात तिने अनेक विषयांना उजाळा दिला आहे. परंतु याच महिनाभर आधीच्या मुलाखतीत तिला १२:१२ व्या मिनिटाला एक प्रश्न विचारण्यात आला की “बॉलीवूडमधील कोणती व्यक्ती तुम्हाला सर्वाधिक आवडते?” त्यावर तिने उत्तर दिलं, “असं काही नाही सर्वच चांगले आहेत”. जर तिच्या सांगण्याप्रमाणे जर सर्वच चांगले असतील तर अचानक एका महिन्यानी असं काय झालं की नाना पाटेकरांवर तिने १० वर्षांपूर्वीच्या गोष्टी #MeToo च्या नावाने पुढे केल्या आहेत.
व्हिडिओ : तनुश्रीच्या मुलाखतीचा एका महिन्यापूर्वीचा व्हिडिओ, नाना पाटेकरांवर आरोप करण्यापूर्वी. ऑफर्स येत आहेत आणि सर्व काही सुरळीत
परंतु कहर काल झाला जेव्हा ती पत्रकार परिषदेत पद्मश्री नाना पाटेकरांना चिंदी चोर म्हणाली तसेच फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्टर १९९५, नॅशनल फिल्म फेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्टर १९९५, फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट व्हिलन २००६ (तामिल), फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट सपोर्टींग ऍक्टर १९९०, नॅशनल फिल्म फेअर अवॉर्ड फॉर बेस्ट सपोर्टींग ऍक्टर – परिंदा, आयफा अवॉर्ड्स फॉर बेस्ट परफॉर्मन्स इन निगेटिव्ह रोल २००६ अशी भली मोठी पुरस्कारांची यादी असलेल्या नटसम्राटाला काल तनुश्री दत्ता पत्रकार परिषदेत तावातावाने नाना “हिरो बनते बनते रहे गया” अशी विकृत टीका केली. वास्तविक कालच्या तिचा भाषेवरून तिचं खरं “फिल्मी” व्यक्तिमत्व समोर आलं आहे. परंतु तिचा कालचा पत्रकार परिषदेतील व्हिडिओ बघण्यापूर्वी तिच्या वात्रट पनाचा हा जुना व्हिडिओ २००८ मधील व्हिडिओ बघा की ती पत्रकारांपासून पोलिसांपर्यंत तेव्हा सुद्धा गलिच्छ शब्दात बोलायची की माध्यमांना त्या व्हिडिओमध्ये पॉज द्यावा लागायचा.
व्हिडिओ : हा आहे तनुश्रीच्या संस्कारी भाषेचा व्हिडिओ, ज्यामुळे इंडस्ट्रीत सर्वच त्रासले होते
आता अमेरिकेत राहणारी तनुश्री दत्ता भारतात आली आहे सुट्या घालवण्यासाठी आणि त्या सुट्या पूर्ण झाल्यावर ती पुन्हा अमेरिकेला जाणार आहे असं स्वतःच जाहीर पणे सांगत आहे. मग कोणाच्या सांगण्यावरून ती पत्रकार परिषद आयोजित करून नाना पाटेकर, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा मुलगा यांचा सुद्धा बोलण्यात समावेश करत आहे. तिने नाना पाटेकरांबद्दल वापरलेले शब्द सुद्धा खूप आक्षेपार्य आहेत तसेच आपण काय बोलत आहोत या पेक्षा आपल्याला काय सूचना दिली गेली आहे एवढं आटपून ती पुन्हा अमेरिकेला गेल्यास आणि निवडणुकीदरम्यान हेच व्हिडिओ जाणीवपूर्वक पसरवले गेल्यास नवल वाटायला नको. दुसरं म्हणजे नाना पाटेकरांना चॅरिटी म्हणजे काय ते माहित आहे काय असं न पटणार विधान तिने केलं आहे. परंतु नाना पाटेकरांबद्दल ग्रामीण भागात पसरवलेली बातमी मनसेच्या अधिक पथ्यावर पडेल हे निवडणुकीपूर्वी हा स्टंट घडवून आणणाऱ्या महाशयांना माहित नसेल कदाचित.
व्हिडीओ जर नीट पाहिला तर आपल्याला दिसेल त्यात सर्व मीडियावाले आहेत. बातमी अशी आहे कि तनुश्रीने एका मीडियावाल्याचा कॅमेरा फेकून दिला, का तर तो फोटो काढत होता. त्यावेळी संतापलेल्या मीडियाच्या लोकांनी तिच्या गाडीवर हल्ला केला. घटनास्थळी पोलिसही हजर होते, जर गाडीची तोडफोड झाली तर गुन्हा का नोंदवला नाही? तनुश्रीच्या समर्थनार्थ कोणतीही वस्तुस्थिती माहित नसताना तिच्या “डिजिटल मदतीला” धावून आलेल्या महिला कलाकार त्यात रेणुका शहाणे या मनसेवर टीका करण्यासाठी या आधी सुद्धा आल्या आहेत, कंगना राणावत या मोदींच्या तसेच भाजपच्या फॅन आहेत आणि अक्षय कुमारची खासदारकी राज ठाकरेंच्या सभेतील एका टोल्यातच गेल्याने ट्वीनकल खन्ना सुद्धा समर्थनार्थ उतरने हा निव्वळ योगायोग समजावा अशी स्थित आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं