'ठाकरे' सिनेमा आडून हवानिर्मिती, लवकरच मोदींसोबत जेवणाच्या टेबलवर युतीची चर्चा?

मुंबई : ठाकरे सिनेमा प्रदर्शित करून प्रत्येक ठिकाणी सिनेमाला जाताना मिरवणुका काढतंच जा असे जणू काही पक्षाचे आदेशच असावे, असं चित्र सध्या अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी अनेकांनी हीच शंका उपस्थित केली होती. पक्षाचे पदाधिकारी सुद्धा कार्यकर्त्यांना आदेश देऊन सिनेमाला जाण्यास सांगत आहेत, असे ठिकाणी प्रसार माध्यमांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकदा का सिनेमा प्रदर्शित झाला की पक्ष लगेचच युतीच्या बोलणीसाठी पुढे जाऊन ‘हिंदुत्वासाठी’ आम्ही एकत्र येत आहोत, असे पारंपरिक कारण पुढे करणार असल्याचे वृत्त आहे.
त्यासाठी एकतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्लीला भेट देऊन पंतप्रधान मोदींसोबत एकत्र भोजन घेणे किंवा स्वतः मोदींनी ‘मातोश्री’ ‘राजभवन’ किंवा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र जेवण करावे अशी योजना असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांकडे आहे. त्यामुळे ठाकरे सिनेमाच्या आडून शिवसेनेकडून निवडणुकीची वातावरण निर्मिती पूर्वनियोजित योजना होती का? अशी शंका प्रसार माध्यमांच्या मनात उपस्थित होते आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीचे सर्वे पाहता एनडीए’ला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यात सर्वात मोठा फटका हा शिवसेनेला बसणार असून त्यांना लोकसभेत २-४ जागा मिळतील असं सर्व्हेत म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांचा सुद्धा पक्षप्रमुखांवर युतीसाठी मोठा दबाव आहे, अशा बातम्या यापूर्वीच शिवसेनेच्या गोटातून आल्या होत्या. त्यामुळे सर्वाधिक दबाव हा शिवसेनेवर आहे यात शंका नाही. सत्ताकाळात दिल्ली ते गल्ली १२-१३ मंत्रिपद घेऊन सुद्धा विकासाच्या बाबतीत कुचकामी ठरल्याने अखेर पुन्हा स्वर्गीय. बाळासाहेबांच्या नावाने भावनिक वातावरण निर्मिती ‘ठाकरे’ सिनेमाच्या आडून केली जात आहे, असेच सध्याचे वातावरण आहे. त्यामागे सिनेमाच्या नावाने भावनिक वातावरण निर्मिती करणे आणि पक्षासाठी निवडणूक फंड उभा करणे हे मूळ उद्देश आहेत. त्यासाठी सुद्धा सिनेमातून उभा राहणारा पैसा शेतकऱ्यांना देईल जाईल असं पिल्लू आधीच सोडून ठेवलं आहे. म्हणजे थोडीफार रक्कम वळती करून पुन्हा ‘कार्य शिवसेनेचे’ नावाने मार्केटिंग करण्याची योजना असल्याचे खात्रीलायक वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आहे.
दरम्यान, एनडीए’मध्ये सुद्धा शिवसेना वगळता एकही मोठा पक्ष शिल्लक राहिलेला नाही. तसेच उत्तर प्रदेशात बुआ-भतीजा एकत्र आल्याने मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. त्यात काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात उतरल्याने डोक्याला हात लावण्याची वेळ मोदी-शहा जोडीवर आली आहे. त्यामुळे भाजपसाठी जागांच्या बेरजेत महाराष्ट्राचे महत्व साहजिकच वाढले आहे, यात शंका नाही. त्यामुळे सिनेमा ते बर्गेंनिंग पावर वाढविण्यासाठी शिवसेनेकडून ठरल्याप्रमाणे सर्वकाही प्रत्यक्षात उतरल्यावर, आता युतीसाठी वेगाने घडामोडी घडताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
सिनेमा पाहण्यासाठी अशा काढल्या जात आहेत मिरवणूक;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं