अहो नोकर्याच नाहीत, तर आरक्षणाचे करणार काय ? नितीन गडकरी

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आरक्षणावर त्यांची रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली असता, त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया मत व्यक्त केलं आहे.
मराठा आरक्षणावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकारण करणे योग्य नाही. नोकर्याच नाहीत, तर आरक्षणाचे करणार काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात आगीत तेल ओतण्याचे काम जबाबदार पक्षाने करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. सर्वांनी मिळून तोडगा काढणे गरजेचे असल्याचेही गडकरी म्हणाले.
तसेच पुढे गडकरी म्हणाले की जात, पंथ आणि भाषा यांच्या आधावरील राजकारण कमी केले पाहिजे. बस जाळणे, हिंसाचार करणे योग्य नाही. सरकार दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल आणि तयार केलेले रस्ते अनेक वर्ष चांगले राहतील याची खबरदारी घेतली जाणार आहे. कंत्राटदाराने कसूर केल्यास कारवाई केली जाईल. मुंबई आणि नवी मुंबईचे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे पहा एकही खड्डा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. जलमार्ग व नदी जोड प्रकल्पाला आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं