नगरमध्ये उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक, सेनेकडून वृत्ताच खंडन.

अहमदनगर : नगरमध्ये उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक झाली असून त्यात काही शिवसैनिक सुद्धा किरकोळ जखमी झाल्याचे कळते. परंतु शिवसेनेकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे कळवले आहे.
उध्दव ठाकरे अहमदनगरमध्ये शिवसेना आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिम्मित आले होते. तेथे त्यांचा एक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्या शेतकरी मेळाव्याला शिवसेना प्रमुख संबोधित करणार होते.
पुढे असेही समोर येत आहे की, सेना स्थानिक आमदार विजय औटी यांचे कट्टर विरोधक आणि तालुकाप्रमुख निलेश लंके गटाने जोरदार घोषणाबाजी करत उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचे आरोप स्थानिकांकडून होत आहेत.
परंतु शिवसेनेने मात्र या वृत्ताचे खंडन केले असून ही वृत्तवाहिन्यांवर येणारी माहिती चुकीची असून अशाप्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुढे असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, शेतकरी मेळावा संपल्यावर उध्दव ठाकरे निघाले असता मागून येणाऱ्या एका गाडीने माजी आमदार अनिलभैया राठोड यांच्या अंगावर चुकून गाडी घातली त्यामुळे झालेल्या तणावातून कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्या गाडीची काच तुटली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं