देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र!' विरोधकांची पोस्टरबाजी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात विरोधकांनी पोस्टरबाजी सुरु केली आहे. विरोधकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी विरोधकांनी हटके पोस्टरबाजी केली आहे. “ठग्स ऑफ हिंदुस्थानच्या” धर्तीवर विरोधी पक्षांनी “ठग ऑफ महाराष्ट्र” असे नाव देऊन हे पोस्टर लावले आहे. त्यात अभिनेता आमीर खानच्या जागी फडणवीसांचा आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरेंच छायाचित्र लावण्यात आलं आहे.
तसेच राज्य सरकारने मागील ४ वर्षांत केलेल्या ठगबाजीचा संपूर्ण पाढाच त्यांनी प्रसार माध्यमांसमोर वाचला आहे. त्यात सामान्यांशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, सामान्य ग्राहकांशी ठगबाजी, बळीराज्याशी ठगबाजी आणि बेरोजगार तरुणांशी ठगबाजी, अशे अनेक प्रकारचे मथळे देऊन सरकारवर बोचरी पोस्टरबाजी केली आहे.
दरम्यान, विरोधी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावीत, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्याताई चव्हाण आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं