सेनेचा वचक हरवला? स्थायी समितीचे अध्यक्ष व सभागृह नेत्यांना अवमानकारकरित्या व्यासपीठावरून खाली उतरवल

मुंबई : मुंबई महानगर पालिकेने आयोजित केलेल्या प्लास्टिकबंदीच्या प्रदर्शना दरम्यान मुंबई स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव व सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अपमानजनक वागणूक देत व्यासपीठावरून खाली उतरविण्यात आलं. विशेष म्हणजे महापालिकेत प्राबल्य असून सुद्धा इतर विरोधी पक्षांना सुद्धा सेनेच्या सन्मानासाठी मैदानात उतरावं लागलं.
मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश कोरगावकरांनी त्या अपमानाबद्दल स्थायी समितीचे लक्ष वेधून चर्चेला तोंड फोडलं. अजून किती दिवस पक्ष प्रशासनाकडून वारंवार अपमान सहन करणार आणि या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाकडून होणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या अपमानाबद्दल पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ,’शिवसेनेचा तो आवाज कुठे गेला’, असा टोला सुद्धा लगावला, परंतु ‘सत्ताधारी शिवसेनेचा अपमान करणाऱ्याला तेथेच कानशिलात का लगावण्यात आली नाही’, असा सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं.
त्यात भाजपने सुद्धा संधी साधत ‘सत्ताधारी शिवसेनेची मुंबई पालिका प्रशासनाला भीती वाटत नसल्यामुळे पालिकेतील लोकप्रतिनिधींचा वेळोवेळी अपमान होत आहे. याचा स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या दालनात बोलवून जाब विचारावा’, असं भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक म्हणाले.
त्यावर ‘पालिकेचे अधिकारी केवळ सर्व शिष्टाचार सांभाळत असून, कोणाचाही अपमान करण्याचा प्रशासनाचा हेतू नव्हता’, असे सांगत मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंगल यांनी उत्तर देऊन विषयाला बगल दिली.
मुंबई महापालिकेवर सलग २१ वर्ष म्हणजे अगदी १९९७ पासून शिवसेनेची सत्ता असल्यापासून पक्षातून आवाज आला की आयएएस अधिकाऱ्यांसह पालिकेतील सर्वच प्रशासकीय वचकून असत आणि पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्याची अजिबात गय केली जात नव्हती. परंतु आता पूर्वी सारखी परिस्थिती राहिली नसल्याची खंत अनेक जुन्या आणि वरिष्ठ नगरसेवकांनी स्थायी समितीत बोलून दाखविली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं