पंकजांना एका तासासाठी मुख्यमंत्री करावं: शिवसेना

मुंबई : जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर आली असती तर क्षणाचा सुद्धा विलंब न लावता मी मराठा आरक्षणाच्या फाईलवर सही केली असती या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानाचा सर्वच थरातून समाचार घेतला आहे. त्यात आता शिवसेनेसुद्धा संधी न घालवता सामना वृत्तपत्रातून पंकजा मुंडे आणि अप्रत्यक्ष रित्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा टोला लगावला आहे.
मराठा आरक्षणाच्या फाईल संदर्भात पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना सामना मध्ये म्हटलं आहे की,’मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात आणि असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर पंकजा यांना एका तासासाठी का होईना, पण मुख्यमंत्रिपद बहाल केलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठा आरक्षण आणि त्यावरून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाचा आधार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिरकस टीका केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात आणि असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर पंकजा यांना एका तासासाठी का होईना, पण मुख्यमंत्रिपद बहाल केलं पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.
त्यापुढे खोचक टीका करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात. ते खरे असेलही. कारण मराठा क्रांतीने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील. म्हणून मुख्यमंत्र्यांनी फाईल कुठे आहे हे शोधून आता तरी फायलीचा लाल दोरा सोडावा, असा टोला ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात. ते खरे असेलही. कारण मराठा क्रांतीने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील. म्हणून मुख्यमंत्र्यांनी फाईल कुठे आहे हे शोधून आता तरी फायलीचा लाल दोरा सोडावा, असा टोला ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना लगावला. त्यामुळे एकूणच ग्रामविकास मंत्री यांनी परळी येथील मराठा समाजाच्या आंदोलकांना संबोधित करताना जोश मध्ये वक्तव्य केलं खरं, परंतु त्यावर आता चोहोबाजींनी टीका होताना दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं