शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका: उद्धव ठाकरे

मुंबई: इतरवेळी राज्य सरकार राजकीय निर्णय प्रचंड वेगाने घेतात, परंतु राज्यातील बहुचर्चित शिवस्मारकाबद्दल हलगर्जीपणाच आहे. भारतीय जनता पक्षाला आडवे येतील त्यांना ‘पटकून’ टाकू अशी भाषा वापरणाऱ्यांचे राज्य सध्या महाराष्ट्रात आहे. तसं असेल तर मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांना सुद्धा पटकून टाका, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे.
‘मुंबईलगतच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा थांबवले आहे. परंतु हे सध्या वारंवार घडताना दिसत आहे. शिवस्मारक उभारणीबाबत सरकार खरंच गंभीर आहे काय? हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो आहे. गुजरातमध्ये नर्मदेच्या तीरावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जागतिक उंचीचा भव्य पुतळा उभा राहिला. परंतु तेथे ना पर्यावरणाची समस्या निर्माण झाली ना कोणता तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला. केंद्र सरकारने सवर्णांना १० टक्के आरक्षण खास घटना दुरुस्ती करून बहाल केले. तर दुसरीकडे मुस्लिम महिलांसाठी बहुचर्चित तिहेरी तलाकचा विषय सुद्धा घटनेत बदल करून संपवला, पण अयोध्येत राममंदिर होत नाही व मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक होत नाही. तेथे कोर्ट आडवे येते की कोर्टाची ढाल पुढे करून कोणी ही स्मारके होऊ देत नाही?’, असा थेट सवाल शिवसेनेने सामनामधून याविषयावर उपस्थित केला आहे.
‘काही दिवसांपूर्वी शिवस्मारकाचे भूमिपूजन अतिशय गुप्त पद्धतीने करण्याचा घाट घातला गेला होता. परंतु, त्यासाठी समुद्रात निघालेली बोटच खडकावर आपटून फुटली आणि बुडाली. दरम्यान, त्यात एका निरपराध तरुणाचा नाहक बळी सुद्धा गेला. शिवस्मारकाच्या उभारणीत केवळ विघ्ने येत आहेत आणि राज्य सरकार त्यावर केवळ मूग गिळून बसले आहे. ३६०० कोटी रुपयांचा हा अति भव्य प्रकल्प आहे, पण पहिल्या दिवसापासून सरकार या कार्याबाबत जराही गंभीर असल्याचे दिसत नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं