मी कासव व्हायला तयार, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार नाही.

घनसावंगी : जालना आणि औरंगाबाद च्या दौऱ्यावर असलेले उध्दव ठाकरे यांची घनसावंगी येथे सभा झाली. सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटन समारंभावेळी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.
आम्हाला मिळालेली सत्ता ही कोणाच्या उपकरणे नाही तर शिवसैनिकांच्या मनगटाच्या जोरावर मिळाली आहे, असा त्यांनी विरोधकांचा समाचार या सभे वेळी घेतला. त्याप्रसंगी त्यांनी अजित पवारांच्या औरंगाबादमधील टीकेला ही उत्तर दिले. अजित पवारांच्या त्या टीकेला त्यांनी तितक्याच जहरी भाषेत उत्तर दिलं, ते म्हणाले की मी कासव व्हायला तयार आहे, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही.
आम्ही सत्तेत राहून शेतकऱ्यांचे भले होणार नसेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार विरोधात उभे राहणारच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त कर्ज माफी झाल्याचे सांगतात, परंतु कोणतीही आकडेवारी द्यायला तयार नाही. पुढे मोदींना उद्देशून ते म्हणाले अहमदाबाद मध्ये इस्त्राईलच्या पंतप्रधानांबरोबर पतंग उडविण्यापेक्षा कश्मीर मध्ये जाऊन तिरंगा फडकावा असा टोला त्यांनी मोदींना लगावला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं