नेटकरी म्हणतात; महाराजांनी खानाला आलिंगन देत त्याचा कोतळा काढलेला, तर मोदींनी शरीफांना आलिंगन देत केक खाल्ला होता

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील एका कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना, लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमीकावा या युद्धकौशल्याशी केली आहे.
आदित्यनाथ म्हणाले की, ‘औरंगजेबाने जेव्हा उन्माद माजवला होता, त्यावेळी त्याला भारत मातेचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नतमस्तक होण्यास भाग पाडले होते. त्यानंतर अफजल खान या औरंगजेबाच्या सेनापतीने अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी खानाचा हेतू ओळखला होता. त्याला शिवाजी महाराजांची हत्या करायची होती. परंतु शिवाजी महाराजांनी त्याचा डाव ओळखला होता. त्याप्रमाणेच नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. चीनलासुद्धा मोदीसरकारमुळे मागे हटाव लागत.
दरम्यान, त्यांनी याच कार्यक्रमात काँग्रेसवर सुद्धा टीका केली. भाजपने सरदार पटेलांचा सन्मान केला, तर काँग्रेसने सरदार पटेलांचा अपमान केला. कदाचित योगी आदित्यनाथ गुजरामधील सरदार पटेलांचा विशाल पुतळा उभारत आहे जो पूर्णत्वाच्या टप्यावर आहे, त्याचा दाखल घेऊन काँग्रेसवर टीका केली असावी. परंतु, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करत होते, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाची साधी एक सुद्धा दोन वेळा उदघाटनाला येणाऱ्या मोदींना रचता आलेली नाही याचा योगिनां विसर पडला असावा. वास्तविक निवडणुकीच्या आधी भारतीय लष्करा सारख्या भावनिक विषयावर भाजप स्वतःच राजकारण अमी मार्केटिंग करत असल्याचा आरोप सध्या होऊ लागले आहेत.
काही महिन्यांपूर्वी मोदी कोणालाही थांगपत्ता लागू न देता पाकिस्तानमध्ये जाऊन नवाझ शरीफांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त गळाभेट घेऊन तसेच केक खाऊन आले होते. नेमका त्याचाच धागा पकडून नेटकऱ्यांकडून योगींचा समाचार घेतला जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं