मुंबई-ठाण्यात मराठी माणूस न एकवटल्यास, भविष्यात त्याला एकही राजकीय वाली नसेल? सविस्तर

मुंबई : सध्या राज्याची राजधानी मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या ठाणे, मीरा-भायंदर शहरांमध्ये मराठी माणूसच अल्पसंख्यांक होण्याच्या दिशेने कूच करत आहे. हिंदी भाषिकांची संख्या इतकी प्रचंड वाढलेली दिसत आहे, की इथली राजकीय गणित देखील मराठी माणसाच्या मतांवर अवलंबून राहिलेली नाही. नेमकं तेच राजकीय वास्तव स्वीकारून मराठी माणसाची शिवसेना सुद्धा उत्तर भारतीयांच्या सन्मानासाठी मुंबई-ठाणे सारख्या शहरात खुलेआम सज्ज झाली आहे. मुबईकर आणि हिंदुत्वाच्या आडून मुंबई-ठाण्यातल्या मराठी माणसाला शिवसेनेने कधी मूर्ख बनवलं याचा पत्ता त्याला स्वतःला सुद्धा अजून लागलेला नाही.
राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत वेगवेगळया भाषा बोलल्या जात असल्या तरी मराठी भाषा ही मुंबईची मुख्य ओळख आहे. मात्र मागच्या अनेक वर्षात स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड भाषिक बदल होत आहेत. त्यामुळे मराठी मुंबईची हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर अशी ओळख बनण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय दृष्ट्या विखुरलेला मराठी समाज हीच मराठी माणसाची ओळख प्रत्येक राजकीय पक्षाने केल्याने त्याला आज मनसे वगळता कोणीही गृहीत धरताना दिसत नाही. परंतु मराठी माणसाच्या वृत्तीने उद्या त्यांना देखील बदलण्यास भाग पाडल्यास नवल वाटायला नको.
मातृभाषे संदर्भातला २०११ सालचा जनगणनेचा जो अहवाल आहे त्यानुसार मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. २००१ साली मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या २५.८८ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ३५.९८ लाख झाले. त्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत २.६४ टक्के घट झाली. २००१ साली ४५.२३ लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले होते. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले.
मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि रायगडमध्येही लोकसंख्येतील हे बदल दिसून येतात. ठाणे, रायगडमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत तब्बल ८० टक्के वाढ झाली आहे. बदलत्या लोकसंख्येमुळे सरकारच्या फक्त नियोजन आणि धोरणांमध्येच बदल होत नाहीय तर या भागात नवीन राजकारणही आकाराला येत आहे. नुकत्याच नव्या मुंबईच्या विकास आराखड्यावर लक्ष दिल्यास कोळी समाज सुद्धा लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्राच्या अन्य भागातून मुंबईला होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण १९६१ साली ४१.६ टक्के होते ते २००१ साली ३७.४ टक्के झाले. त्याचवेळी उत्तर प्रदेशातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण वाढले. १९६१ साली उत्तर प्रदेशातून मुंबईत १२ टक्के स्थलांतरीत येत होते तेच प्रमाण २००१ साली २४ टक्के झाले. स्थलांतर आणि शहर अभ्यास विभागाच्या राम बी भगत यांनी ही माहिती दिली. हे उत्तर भारतीय स्थलांतरीत असंघटित क्षेत्रात मोठया प्रमाणावर आहेत. इथे वेतनही कमी आणि कामाचीही हमी नसते.
दरम्यान, मराठी मातृभाषिकांची संख्या कमी झाली असली तरी आजही अन्य भाषिकांच्या तुलनेत मुंबईत मराठी मातृभाषिकांची संख्या जास्त आहे. २००१ साली मराठी मातृभाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ४५.२४ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले. त्याच दशकभरात गुजराती भाषिकांची संख्या किंचित कमी झाली. २००१ साली १४.३४ लाख लोकांनी गुजराती मातृभाषा असल्याचे सांगितले होते. २०११ मध्ये हीच संख्या १४.२८ लाख होती.
२००१ साली ऊर्दू भाषिक १६.८७ लाख होते. २०११ मध्ये हे प्रमाण १४.५९ लाख झाले. फक्त हिंदी भाषिकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. २५.८२ लाखावरुन हिंदी मातृ भाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ३५.९८ लाख झाली. ३९.३५ टक्के ही वाढ आहे. कुटुंब विस्तार आणि मुंबईत वाढलेल्या जागांच्या किंमतीमुळे मूळ मराठी भाषिक मुंबईकर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वास्तव्याला गेला. पण तिथेही हिंदी भाषिकांची संख्या झपाटयाने वाढली. ठाणे जिल्ह्यात हिंदी भाषिकांची संख्या ८०.४५ टक्के तर रायगड जिल्ह्यात ८७ टक्के आहे.
त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठी माणूस कोणत्याही एकाच पक्षाकडे न एकवटल्यास, त्याला भविष्यात कोणीही वाली नसेल हे वास्तव आहे. मराठी मतदार स्वतःची वृत्ती बदलण्यास तयारच नसेल तर भविष्यात मनसे आणि राज ठाकरे यांना देखील बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वतःला बदलावे लागेल. त्यावेळी त्यांना देखील राजकीय पक्ष म्हणून दोष देण्यात अर्थ नसेल. नेहमी एकमेकांवर आणि स्वकीयांवर चिखलफ़ेक करून, स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानणाऱ्या मराठी माणसाचीच त्यात सर्वस्वी चूक असेल. त्यामुळे मुबई-ठाण्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मराठी माणसाच्या एकीची परीक्षा पाहणारी असेल. अन्यथा त्याला भविष्यात राजकीय दृष्ट्या कोणीही वाली नसेल हे नक्की.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं