तो VIDEO वायरल: उद्धव ठाकरेंनी स्वतःला २५ कोटींचा गंडा बांधून घेतला - शिशिर शिंदें

मुंबई : शिशिर शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर खूप वायरल होत आहे. त्यात मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे जे सध्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या सर्वच प्रसार माध्यमांमध्ये आल्या आहेत. या व्हिडिओ मध्ये त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राज्यसभेच्या उमेदवारीवरून खूप गंभीर आरोप केले होते.
शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जाहीर टीका करताना गंभीर आरोप केला होता की त्यांनी राज्यसभा उमेदवारीच्या मोबदल्यात व्हिडियोकॉनचे संस्थापक राजकुमार धूत यांच्याकडून स्वतःला २५ कोटी रुपयांचा गंडा बांधून घेतला आणि शिवसैनिकांना मात्र दोऱ्याचा गंडा घातला. विशेष म्हणजे ते पुढे म्हणाले होते की, राज साहेब तुम्ही आम्हाला जे बांधून ठेवलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताच्या विचाराने बांधून ठेवलं आणि त्यामुळे आम्हाला अशा गंड्यांची वगरे गरज पडत नाही.
२०१६ मध्ये अनेक नामांकित वर्तमान पत्रात सुद्धा अशा बातम्या झळकल्या होत्या की, २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी शिवसेनेला सर्वाधिक निधी (डोनेशन) हा एकट्या व्हीआयएल म्हणजे व्हिडिओकॉन इंडस्ट्रीस लिमिटेड कडून मिळाला होता. राजकुमार धूत हे शिवसेनेचे तीन टर्म राज्यसभेचे खासदार होते आणि ते व्हिडिओकॉन समूहाचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर वेणुगोपाल धूत यांचे भाऊ होते.
शिशिर शिंदे काय म्हणाले होते उद्धव ठाकरेंना उद्देशून;
बंधन बांधायचं काम त्यांच, बंधन त्यांनी बांधलं, शिवसैनिकांना पक्षाध्यक्षांनी बंधन बांधलं आणि स्वतः काय व्हिडियोकॉनच्या राजकुमार धूत कडून गंडा बांधून घेतला. बरं गंडा साधा सुधा नाही बांधला, कार्यकर्त्यांना तो साधा शिवबंधन दोरा आणि स्वतःला मात्र गंडा, २५ कोटींचा गंडा राजकुमार धूत कडून. तुम्हाला जर शिवबंधन बांधायचं होत तर मुंबईच्या महापौरांना बांधायचं होत, स्टँडिंग कमिटी चेअरमन राहुल शेवाळेंना बांधायचं होत. आणि फार काही सांगायची गरज नव्हती एवढंच सांगायला पाहिजे होत, की ज्या मुंबईकर जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला तसा विश्वासघात लोकांचा करणार नाही. उत्तम रस्ते देऊ, साफ सफाई करू, खड्डे मुक्त रस्ते देऊ, असं काही तरी करण्यासाठी त्यांना हा गंडा द्यायला पाहिजे होता. पण त्यांना गंडा दिला, त्यांना गंडवल आणि स्वतः मात्र व्हिडियोकॉनच्या राजकुमार धूत कडून २५ कोटींचा गंडा बांधून घेतला.
पुढे राज ठाकरेंना उद्देशून;
आपल्याला असं काही लागत नाही, साहेब तुम्ही आम्हाला जे बांधून ठेवलं आहे ते महाराष्ट्राच्या हिताच्या विचाराने बांधून ठेवलं आणि त्यामुळे आम्हाला अशा गाड्यांची वगरे गरज पडत नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं