'सेनेला मत म्हणजे भाजपला मत', समाज माध्यमांवर जोर धरला

मुंबई : २०१४ पासूनच्या सर्व निवडणुकीत शिवसेनेने नेहमीच मराठी माणसाच्या समोर मनसेबद्दल एक संभ्रम उभा करून ठेवला, तो म्हणजे जर मनसेच्या उमेदवाराला मतं दिली तर शिवसेनेच्या उमेदवाराला फटका बसून त्याचा थेट फायदा काँग्रेसला होतो. परंतु मराठी मतदार हा सर्वच पक्षांना म्हणजे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सुद्धा मतदान करतो हे वास्तव शिस्तबद्ध लपवून नेहमीच मनसेबद्दल संभ्रम कायम ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नं केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघरमध्ये घेतलेली प्रचंड जाहीर सभा आणि त्याला स्थानिकांचा मिळालेला प्रतिसाद हा पालघरमध्ये मनसेची ताकद दाखविण्यासाठी पुरेसा होता. मनसेने जर त्यांचा उमेदवार पालघर पोटनिवडणुकीत दिला असता तर शिवसेनेला पराभवाचं खापर फोडण्यासाठी आयतच कारण मिळालं असत. तेच पराभवाचं कारण नसल्याने, अखेर पालघर पोटनिवडणुकीतील पराभवच सर्व खापर निवडणूक आयोगावर फोडण्यात आलं आहे.
२०१४ पूर्वी शिवसेनेने नेहमीच मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत असा भास मराठी मतदाराच्या मनात निर्माण केला. वास्तविक २०१४ पासून शिवसेनेच एकूणच निवडणुकीआधीच प्रचार तंत्र आणि निवडणुकी नंतरची भूमिका बारकाईने पाहिल्यास, सध्या शिवसेनेला मत म्हणजे भाजपला मत अशी मराठी मतदारांची धारणा होऊ लागली आहे. पालघर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तेतील सहभागाबद्दल पत्रकारांनी विचारताच त्यांनी विषयांतर करण्याचा प्रयत्न केला, तसेच पत्रकार परिषद आटोपती घेतली हे पाहायला मिळाल.
एका बाजूला देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही म्हणायचे आणि दुसऱ्याबाजूला त्याच भाजप बरोबर सत्तेत खेटून राहायचे हे शिवसेनेचे तंत्र मतदाराला चांगलेच उमगले आहेत. दुसरी बाजू म्हणजे शिवसेनेने स्वतंत्र निवडणूका लढविण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी त्यांचे मंत्री केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामील आहेत. विशेष म्हणजे ते आजही एनडीएचा भाग आहेत. कारण टीडीपी ने सुद्धा सत्तेचा त्याग केला, परंतु त्यांनी एनडीएतून सुद्धा काडीमोड घेतला आहे. परंतु शिवसेनेने एनडीए मधील सहभागाबद्दल काहीच वाच्यता केलेली नाही. त्यामुळे भविष्यात काय होऊ शकत याचा अंदाज येतो.
त्यामुळे यापुढे शिवसेनेने मराठी मतदारांपुढे पुन्हा मनसेबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तो त्यांच्या अंगलट येऊ शकतो, कारण मागील ४-५ वर्षातील शिवसेनेचे निवडणुकीचे तंत्र मराठी माणसाने अनुभवले असून उलट ‘शिवसेनेला मत म्हणजे भाजपला मत’ असं वातावरण समाज माध्यमांवर होऊ लागलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं