वाह मोदीजी वाह, इतर मंत्र्यांना मीडिया सोबत व्यस्त ठेऊन पाकिस्तानला गाफील केले

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या दाव्यानंतर पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीने तातडीची बैठक बोलावली आणि याचे नेतृत्व पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. या बैठकी नंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या वृत्ताचे खंडन केले. त्यांच्या मते भारतीय हवाईदल पाकिस्तान हद्दीत शिरताच पाकिस्तान एअर फोर्स सतर्क झाली आणि भारतीय विमानांनी लगेच पळ काढला.
भारताचा उल्लेख करताना त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला, त्यांच्या मते मतदान आणि निवडणुकीला समोर ठेऊन नरेंद्र मोदी डाव साधत आहेत. निवडणुकीआधी ते घाबरले आहेत आणि सत्ता टिकवण्यासाठी असे प्रकार करून ते लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु पाकिस्तान हा भारताला समांतर उत्तर देईल अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.
त्यांनी पत्रकार परिषदेत असेही नमूद केले, कि नरेंद्र मोदींनीं पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या मंत्र्यांद्वारे मीडियाला गाफील आणि एंगेज ठेवला जेणेकरून या स्ट्राईक आधी कोणाचं लक्ष जाऊ नये आणि बातमी लीक होऊ नये. तसेच पाकिस्तान डिफेन्स चे सगळे लक्ष या गोष्टींकडे केंद्रित व्हावे आणि त्यांच्या नकळत हल्ला करावा अशी योजना आखली. परंतु आमच्या मते जर हि मोदींची स्ट्रॅटेजि असेल तर भारतीयांना ती खूपच रुचली म्हणायला हरकत नाही.
एका पत्रकाराने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्नही केला. त्याचा प्रश्न होता “पाकिस्तान भारताला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे का”, यावर कुरेशींनी स्वतःचा राग आवरत आपण नक्की पाकिस्तानी आहात ना? असा उलट सवाल केला आणि पुन्हा भारताला लवकरच उत्तर दिले जाईल अशी दर्पोक्ती केली. शेवटी नरेंद्र मोदींनी सेनेला दिलेली सूट आणि त्यांनी दिलेला निकाल पाहता आज प्रत्येक भारतीय हेच म्हणेल “वाह मोदीजी वाह”.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं