'आम्ही कागदी नव्हे तर खरे वाघ आहोत', शिवसेनेला अप्रत्यक्ष सणसणीत टोला?

नागपूर : आज नागपूर कोराडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांचा संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष सणसणीत टोला लगावला आहे. त्यापुढे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अनेक मुद्यांवर अप्रत्यक्ष आणि बोचरी टीका केली आहे.
शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की,’वुई आर नॉट पेपर टायगर्स, मात्र काही आहेत पेपर टायगर्स’ असं विधान केलं. तसेच काही नेते फक्त वर्तमानपत्रांमध्ये छापून आणून स्वतःला मोठे नेते समजतात, असं जोरदार टीकास्त्र केलं. भाजप कार्यकर्ते हेच खरे टायगर्स आहेत आणि आम्ही जनतेत जाऊन काम करणारे लोकं आहोत अशी भाजप कार्यकर्त्यांवर स्तुती सुमन सुद्धा उधळली.
भाजपने केलेल्या कामावरून काँग्रेस पक्ष समाज माध्यमांच्या मार्फत जनतेमध्ये भ्रम पसरवत असल्याचा आरोप त्यांनी थेट काँग्रेस पक्षाच नाव घेत केला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या प्रयत्नांना तर्कशुद्ध माहितीच्या आधारे प्रतिउत्तर देणे गरजेचे आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सूचित केलं. तसेच स्वामिनाथन समितीचा २००५ मध्ये अहवाल येऊन सुद्धा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर काहीच केलं नाही. आता तेच देशभर शेतकऱ्यांचे कैवारी असल्यासारखे आंदोलन करत असल्याचा टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं