डिझेलचे दर कमी करणं आमच्या हातात नाही: मोदी सरकारने हात वर केले

नवी दिल्ली : इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसनं ‘भारत बंद’ची हाक आज दिली होती. देशभरातील जवळपास २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला होता. या बंदला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपने दुपारीच घाईघाईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, भाजपाचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोल – डिझेल तसेच इतर इंधनाचे दर वाढले आहेत, असं स्पष्ट करून आमच्या हातात काहीच नाही असा थेट संदेश देऊन हात वर केले आहेत.
आम्ही जनतेसोबत आहोत आणि सामान्यांच्या त्रासाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, परंतु पेट्रोल – डिझेलचे दर नियंत्रित करणे आमच्या हातात नाही असं सांगत पूर्णपणे हात झटकले आहेत. विरोधक रस्त्यावर उतरले असले तरी आज देशात काय सुरू आहे? पेट्रोल पंपांवर तोडफोड सुरू आहे. बसेस जाळल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,’ असं भावनिक विधान पुढे करत मूळ महागाईच्या विषयाला बगल देण्याचा केविलवाणा प्रयत्नं त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेस पक्ष सध्या नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे. त्यातूनच त्यांनी भारत बंदची हाक दिल्याचा टोला रवी शंकर प्रसाद यांनी लगावला. परंतु सरकार नेमकं सर्व महागाई कमी करण्यासाठी काय उपाय योजना करणार यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं