राफेल करार: तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो, फ्रान्सच्या विद्यमान अध्यक्षांनी हात झटकले

पॅरिस : फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी राफेल करारावरुन हात झटकले आहेत. कारण अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन राफेल करारासंबंधित विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तर देण्यापेक्षा ते प्रश्नांना टाळणं पसंत करत आहेत. भारत आणि फ्रान्सदरम्यान ३६ राफेल लढाऊ विमानांच्या लाखो डॉलर्सचा करार झाला तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो, असं इमॅन्युएल मॅक्रोन यांनी राजकीय अनुषंगाने उत्तर दिल आहे. ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्यांनी हे उत्तर दिल.
यावेळी पत्रकारांशी बोलताना फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या आरोपानुसार पत्रकारांनी त्यांना भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्सला भारतीय पार्टनर म्हणून निवडण्यासाठी फ्रेंच सरकार किंवा डसॉल्टकडे शिफारस केली होती का अशी विचारणा करण्यात आली. त्याला उत्तर देताना त्यांनी आरोप फेटाळत प्रतिक्रिया देताना म्हटलं की,’मी त्यावेळी सत्तेत नव्हतो. मात्र मला माहित आहे की, आमचे नियम अत्यंत स्पष्ट आहेत आणि ही दोन सरकारांमधील चर्चा आहे. हा करार एक व्यापक मांडणीचा भाग आहे, जो भारत आणि फ्रान्समधील लष्कर आणि सुरक्षेचं गठबंधन आहे’, असं इमॅन्युएल मॅक्रोन यांनी म्हटलं आहे.
गतवर्षीच्या मे महिन्यात इमॅन्युएल मॅक्रोन यांची फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. तर दुसरीकडे नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये राफेल लढाऊ जेट विमान कराराची घोषणा केली होती. परंतु त्यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद होते असं म्हटलं आहे. फ्रान्सच्या विद्यमान सरकारने या संबंधित आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलं की, ‘राफेल लढाऊ फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात भारतीय कंपनीची निवड करण्यामध्ये आमची कोणतीही भूमिका नव्हती. संबंधित करारासाठी कुठल्या भारतीय कंपनीला भागीदार म्हणून निवडायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य फ्रेंच कंपनीला होत, असं स्पष्टीकरण देण्यात आलं होत.’
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं