यापूर्वीचा पुलवामा हल्ला; 'सैन्यात जवान असाल तर जीव जाणारच' असं भाजप खासदार नेपालसिंह बरगळले होते

नवी दिल्ली : एक दिवसापूर्वी सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. देशभरातून संतप्त प्रतिकिया देखील येत आहेत. परंतु, पुलवामा मधील लष्कराच्या जवानांवर झालेला हा काही पहिला भीषण हल्ला नव्हता. यायाधी सुद्धा पुलवामातील प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला होता. परंतु देशवासीयांची विसरण्याची प्रवृत्ती राजकारण्यांच्या पथ्यावर पडते. तसं पुन्हा होऊ नये अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी पुलवामा येथे लष्कराच्या प्रशिक्षण केंदावर हल्ला झाला होता तेव्हा, भाजपचे उत्तर प्रदेशातील रामपूरचे खासदार नेपाळसिंह यांना पत्रकारांनी पुलवामाच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी एक विक्षिप्त प्रतिकिया दिली होती. ‘सैन्यातील जवान हे रोजच मरतात. इतकंच नाही तर जगाच्या पाठीवर असा कोणता देश आहे जिथे युध्दात सैनिक मरत नाहीत’ असं ही ते बरगळले होते.
त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या, परंतु त्यादेखील क्षणिक ठरल्या होत्या. एकीकडे जम्मू काश्मीरच्या पुलवामातील प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह प्रतिकिया देत होते की ‘आपल्या जवानांच बलिदान व्यर्थ जाणार नाही’. तर दुसरीकडे त्यांचेच भाजप सरकारमधील खासदार आपल्याच बहाद्दूर जवानांबद्दल असे विक्षिप्त विधान करत होते. त्यांच्या या विधानामुळे देशभर त्यावेळी देखील संतापाची लाट उसळली आहे. देशात तेच तेच प्रकार पुन्हा त्याच ठिकाणी घडत आहेत, परंतु दशवासियांची विसरण्याची प्रवृत्तीची आजही तिथेच आहे, हे देखील वास्तव आहे.
Video – पुलावामातील यापूर्वीच्या हल्ल्यानंतर काय म्हटलं होतं नेपाळसिंग यांनी;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं