नाणार प्रकल्पाबाबत चिडीचूप असणारे शिवसैनिक, आज इतरांना पर्यावरण व प्रदूषणाचे धडे का देत आहेत? सविस्तर

मुंबई : काल संपूर्ण महाराष्ट्रात प्लस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. वास्तविक प्लास्टिक बंदीला कोणत्याही पक्षाने आक्षेप घेतलेला नाही. निसर्गाला आणि प्रभूषणाला विशेष करून जल प्रदूषणाला कारणीभूत असणारा सर्वाधिक मोठा घटक म्हणजे प्लास्टिक हाच आहे. प्लास्टिकचा अतिवापर आणि त्यासाठी आवश्यक असणारी पर्यायी व्यवस्था ही आपल्याकडे उपलब्ध तरी होती का हा प्रश्नच आहे. पण एक विषय प्रकर्षाने समोर आला तो म्हणजे निसर्गरम्य कोकणातील विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आणि त्या प्रकल्पामुळे भविष्यात कोकणातील समुद्र, नद्या, शेतजमीन, जल संपत्तीवर कोणते दूरगामी परिणाम होतील या बद्दल कोणतीही वाच्यता न करणारे शिवसैनिक आज संपूर्ण महाराष्ट्राला समाज माध्यमांवर निसर्ग आणि पर्यावरणाचे धडे देत आहेत.
वास्तविक निसर्गाचं महत्व आणि प्रदूषणाचे दुष्परिणाम, आज शिवसैनिक जस महाराष्ट्राला सांगत आहेत ते आधी त्यांनीच समजून घेतले असते तर निसर्गरम्य कोकणात नाणार रिफायनरीसारखे समुद्र, नद्या, शेतजमीन, जल संपत्तीवर दीर्घकालीन दुष्परिणाम करणारे प्रकल्प आलेच नसते. शिवसेनेच्या स्थानिक आमदार, खासदार, मंत्री आणि कार्यकर्त्यांना तेव्हा निसर्ग आणि प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम ध्यानात आले नव्हते की ध्यानात घ्यायचेच नव्हते असा प्रश्न उपस्थित होतो.
संपूर्ण नाणार रिफायनरी प्रकरण कोकणात पेट घेऊ लागलं आणि महत्वाचं म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी गॊप्यस्फोट केला होता की, नाणार प्रकल्प हा जरी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न असला तरी त्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पुढाकार घेतला होता. असा प्रकल्प कोकणात यावा अशी कोकणवासीयांची सुद्धा कोणतीही मागणी नसताना, स्थानिकांच्या जमिनी खरेदी विक्री करण्याचे प्रकार सुरु करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिकांकडून इतका कडाडून विरोध सुरु झाला की, थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना इशारा देण्यात आला की, ‘आधी तुमच्याकडील उद्योग खात्याने जारी केलेला शासकीय अध्यादेश रद्द करा अन्यथा इथे पाय ठेऊ नका’, एवढा टोकाचा रोष शिवसेने विरुद्ध कोकणात धुसपूसत होता.
निसर्गरम्य कोकणात नाणार रिफायनरीसारखे प्रदूषणामुळे निसर्गावर दूरगामी परिमाण करणारे प्रकल्प आणण्याआधी शिवसेनेला निसर्ग आणि पर्यावरण प्रेम का नाही आठवलं, जस काल अंमलात आणलेल्या प्लास्टिक बंदीनंतर आठवलं असाव. त्यामागच खरं वास्तव हे आहे की प्लास्टिक बंदी हे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे याच्याशी संबंधित आहे आणि तेच मुख्य कारण आहे की शिवसैनिक आज समाज माध्यमांवर महाराष्ट्राला आम्ही कसे निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षणकर्ते आहोत याचे धडे देत आहेत. वास्तविक प्रदूषण हा सार्वत्रिक पणे समजून घेण्याचा विषय आहे. परंतु तो जर स्वतःच्या सोयीनुसार समजून घेण्याचा आणि समजून देण्याचे प्रकार सुरु राहिले तर त्यात यश कितपत येईल हे विचार करण्यासारखं आहे.
भाजपने स्वतःला प्लास्टिक बंदीच्या निर्णयापासून लांब ठेवले आहे आणि त्यामागील दुसरं वास्तव हेच आहे की प्लास्टिक बंदी फसणार याची त्यांना चुणूक लागली आहे. कारण हा विषय मोठं मोठे दंड आकारून मार्गी लागणार नाही. यातून केवळ इन्स्पेक्टर राज वाढीस लागणार आहे हे वास्तव आहे. नियम, बंदी आणि दंड हे काही राज्यात नवीन नाही आणि उदाहरण द्यायचं झालं तर गुटखा बंदी झाली पण वास्तव सर्वांना माहित आहे. त्यानंतर वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता हायवेवर दारू विक्री बंदी झाली आणि नंतर काय झालं हे सर्वश्रुत आहे. तसंच काहीस प्लास्टिक बंदीच होणार असून त्याची संपूर्ण कल्पना भाजपला असल्याने ते स्वतःला यापासून दूर ठेऊन आहेत.
संपूर्ण स्पष्टीकरणाचा मुद्दा इतकाच आहे की, राज्यातील प्लास्टिकबंदी नंतर समाज माध्यमांवर शिवसैनिकांनी दाखवलेली पर्यावरणासंबंधित आपुलकी आणि प्रदूषणाप्रतीची सतर्कता निसर्गरम्य कोकणातील नाणार रिफायनरी संदर्भात का दाखविली नाही. तसेच त्या प्रकल्पाचे कोकणावर होणारे दूरगामी दुष्परिणाम त्यांना समाज माध्यमांवर का व्यक्त करावे वाटले नसावे? अर्थात स्वतःच्या सोयीप्रमाणे पर्यावरण, प्रदूषण समजून घेणे आणि इतरांना समजावणे असेच असावे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं