झोपडपट्टीतील लोक सोबत असतात, तेव्हा जिंकण्याची खात्री....पण बुद्धिवादी लोकं?

झोपडपट्यांमध्ये राहणारी लोकं सोबत असतात, त्यामुळे जिंकण्याची निश्चित खात्री असते. पण बुद्धिवादी लोकं सोबत असली तर मात्र जिंकण्याची खात्री नसते असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दी आयडिया ऑफ न्यू इंडिया’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमाला उद्योजक श्रीराम दांडेकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. भारतकुमार राऊत, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह सुरेश देवळे, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे कार्याध्यक्ष भूषण मर्दे, उपाध्यक्ष वीरभद्र दुलानी, कार्यवाह रमेश देवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रनिर्माण करणारा नेहमी १०० वर्षांचा विचार करतो. आणि आपण राष्ट्रवादी विचारांचे आहोत. त्यामुळे आपला देश सर्वसंपन्न व्हावा, शक्तिशाली ऐश्वर्यसंपन्न असावा हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. पण भारतात विचारशून्यात ही एक मोठी समस्या आहे. “No one can claim he is perfect”, अगदी मी सुद्धा नाही. मी सुद्धा अपूर्णांक, माझेच विचार योग्य आहेत असे मी कधीच मानत नाही, असेही गडकरी यांनी मान्य केले.
मी काही इंजिनियर नाही. परंतु, निर्णय न घेणं ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. भारताची लोकसंख्या मोठी आहे, आणि ती एक गंभीर समस्याही आहे. ज्यावेळी मुंबईतील उड्डाणपूल केले तेंव्हा वाटले होते वाहतूक समस्या सुटेल, पण गाड्या इतक्या वाढल्यात की समस्या अजूनही तशीच कायम आहे असं गडकरी म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं