राज यांनी मोदींविरोधी भूमिका का घेतली असावी? बाळासाहेबांची 'ती' भूमिका बरंच काही सांगून जाते?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रास सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका करत त्यांच्या धोरणांना विरोध केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसे यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती, परंतु त्याच वेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भाजप विरोधी काम करण्याच्या सूचना तर दिल्याचं, परंतु आतापासूनच विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
मात्र त्यानंतर राज ठाकरे यांच्या या निर्णयावरून सर्वत्र चर्चा देखील सुरु झाली. मात्र लोकसभा निवडणूक न लढवण्याचा मनसेचा निर्णय योग्य आहे हे पटवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी भूतकाळात घेतलेल्या अशा निर्णयांचा आधार घेतला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निर्णयामधील साम्य शोधणारी व्हिडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
निवडणूक लढवली नाही याचा अर्थ तलवार म्यान केली, असा होत नाही तर भविष्यातील मोठ्या लढाईसाठी तलवार परजली जात आहे. असा दावा या व्हिडिओ क्लिपमधून मनसेकडून केला जात आहे. सुरुवातीच्या काळात कट्टर विरोधकांना पराभूत करण्यासाठी बाळासाहेबांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्याचा फायदा काँग्रेसच्या एका गटाला झाला होता. मात्र बाळासाहेबांनी हा धोरणात्मक निर्णय घेतला होता.
इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी जाहीर केली तेव्हाही बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना भवनावर हल्ला झाला होता. त्यानंतर १९७९ मध्ये काँग्रेसने शिवसेनेकडे पाठिंबा मागितला होता. त्याची परतफेड म्हणून काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे तीन आमदार विधानसभेत गेले होते. अशा प्रकारे बाळासाहेबांनी विखारी लाटेत राजकीय चातुर्य दाखवत संघटना पुढे नेली. असे या व्हिडिओत म्हटले आहे.
त्याचप्रमाणे राज ठाकरेही आगामी काळात वाटचाल करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच त्या मोबदल्यात मोठा राजकीय फायदा मनसेला भविष्यात होण्याची शक्यता आहे, जसा त्यावेळच्या बाळासाहेबांच्या निर्णयाने शिवसेनेला झाला होता.
काय आहे तो नेमका व्हिडिओ
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं