येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा!

काही दिवसांपासून चाललेल्या कर्नाटकाच्या नाट्यमय सरकार स्थापनेचा अखेर शेवट झाला आहे. शेवट काहीसा अपेक्षित काहीसा अनपेक्षितच आहे. भाजपने कर्नाटकात चालवेलया पैशाच्या घोडेबाजाराला यश आलं नाही आणि त्यांना सत्तेवर पाणी सोडावा लागलं आहे. कर्नाटक विधानसभेमध्ये भावनिक भाषणानंतर येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
जनमतानुसार सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता मिळायला हवी होती पण काही ठिकाणी निसटत्या विजयामुळे आम्ही पूर्ण बहुमतात येऊ शकलो नाही. त्यांनी आपल्या भाषणात जनतेचे आभार देखील मानले.
आमच्याकडे स्पष्ट बहुमत नाही पण बहुमतासाठी मतदान करताना आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा आणि योग्य तो मतदानाचा निर्णय घ्यावा असे भावनिक आव्हान देखील त्यानी सर्व आमदारांना केले.
अडीच दिवसाचे मुख्यमंत्री राहून त्यांनी अखेर राजीनामा दिला आणि या संपूर्ण नाट्यमय घडामोडींवर पडदा पाडला आणि काँग्रेस – जेडीएसला सत्ता स्थापनेचे आव्हान केले. तरीही जर कर्नाटकात मध्यवर्ती निवडणूका लागल्या तर भाजप संपूर्ण बहुमताचे सरकार निवडून आणेल हा विश्वास व्यक्त केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं