हात-पाय बांधा मतदारांचे आणि मतदान केंद्रावर आणा: भाजप कार्यकर्त्यानां आदेश

बंगळुरु : देशातील निवडणूक भाजप कोणत्या थराला घेऊन जात आहे त्याचा प्रत्यय आला आहे. कर्नाटक निवडणुकीत जे मतदार मतदान करणार नाहीत, त्या मतदारांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रावर आणा आणि भाजपला मत देण्यासाठी भाग पाडा’ असं येडियुरप्पा भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना थेट आदेशच जारी केले आहेत.
भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडियुरप्पा बेळगावी जिल्ह्यात कित्तूर मतदारसंघात महांतेश दोड्डागुदर यांच्या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना थेट आदेश दिले की,’कार्यकर्त्यांनो आता आराम करत बसू नका. तु्म्हाला वाटत असेल, की एखादा मतदार मतदान करत नाही, तर तुम्ही थेट त्यांच्या घरी जा, त्यांचे हात-पाय बांधा आणि त्यांना महांतेश दोड्डागुदर यांना मत देण्यासाठी घेऊन या’ असा आदेशच येडियुरप्पांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
राज्यातील विधानसभेच्या निमित्ताने संपूर्ण कर्नाटकात वातावरण तापलं असलं तरी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी तर थेट हुकूमशाहीचा आदेशच भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. येडियुरप्पा यांच हे विधान त्यांना चांगलच भोवण्याची शक्यता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिउत्तर देताना म्हटलं आहे की, भाजप मतदारांना धमकावत आहे. परंतु येडियुरप्पा यांच्या या वक्तव्याने कर्नाटकात संताप व्यक्त केला जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं