येडियुरप्पांचा शपथविधी झाला, काँग्रेसचे ४ आमदार 'गेले कुठे' ?

कर्नाटक : येडियुरप्पांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर त्यांना 15 दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करावं लागणार. परंतु त्यांचा शपथविधी झाला असला तरी काँग्रेसचे ४ आमदार हे नॉट रिचेबल झाले आहेत.
काल रात्री उशिरापर्यंत सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी झाली. काल संपूर्ण दिवस आणि रात्री उशिरापर्यंत सरकार स्थापनेवरून नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अखेर सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.
अखेर राज्यपालांनी रात्री भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण आणि येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. भाजपकडे एकूण संख्याबळ १०४ असून त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिल्याने त्यांच संख्याबळ १०५ वर पोहोचलं आहे.
त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना अजून ७ आमदारांची गरज भासत आहे. त्यातच काँग्रेसचे ४ आमदार २४ तासापासून पक्षाच्या संपर्कात नाही त्यामुळे या मागे भाजपचा हात असल्याचा संशय आरोप काँग्रेसने केला आहे. एकूणच या फोडाफोडीच्या राजकारणात अजून काय घडणार आहे ते येत्या १०-१५ दिवसात स्पष्ट होणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं