होय जाणारच अमितच्या लग्नाला, त्यात राजकारण नाही! आदित्य ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेचं लग्न येत्या २७ जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिकाही मातोश्रीवर नेऊन दिली, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला लग्नाचे निमंत्रण दिले. परंतु, पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना लग्नाला जाणार का असा गमतीने प्रश्न विचारला.
त्यावर आदित्य ठाकरे म्हटले, “हो जाणारच आणि जावंच लागणार त्यात राजकारण नाही”. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचा मुलगा ही सख्खी चुलत भावंडं आहेत. परंतु राजकारणातील सावली नात्यांवर इतकी सुद्धा गडद नाही पडली, जितकी माध्यमांनी ती रंगवली असेच म्हणावे लागेल.
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह सोहळा २७ जानेवारी रोजी मुंबईत पार पडणार आहे. दरम्यान, या दोघांचा साखरपुडा ११ डिसेंबर २०१७ रोजी पार पडला होता. आणि आता २७ जानेवारीला समस्त ठाकरे कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या आशीर्वादाने विवाहसोहळा पार पडणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं