ऑडिओ व्हायरल: राम कदमांना कॉल करून सुनावले, तुमचे आताचे गुरु एकदम घाणेरडे असल्याने विचार घाणेरडे झाले

पालघर : भाजपचे स्वयंघोषित डॅशिंग आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच थरातून जोरदार टीका केली जात आहे. आमदार राम कदमांच्या विरोधात मनसेनेसुद्धा आघाडी उघडली असून, त्यांच्या विरोधात पोश्टरबाजी आणि त्यांना कॉल करून चांगलेच सुनावत आहेत.
मुलगी नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू आणि तुम्हाला देऊ असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसेने जोरदार आधीच बॅनरबाजी केली आहे. मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानासमोर सुद्धा बॅनर लावले आणि निषेध नोंदवला आहे. परंतु हे बॅनर पहाटे पोलिसांनी हटवले असून घाटकोपरमधील बॅनरबाजी प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त सकाळी प्रसिद्ध झाले.
त्यात भर म्हणजे आता पालघरचे महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांनी सुद्धा स्वतः भाजपचे आमदार राम कदम यांना कॉल करून जळजळीत प्रश्न आणि उत्तर दिल आहे. तुलसी जोशी यांनी राम कदमांचा सध्याचा थेट गुरूच काढला आहे. स्वतःला वारकरी संप्रदायातले असल्याचे सांगताना आमदार राम कदम महिलांबाबत अतिशय आक्षेपार्ह विधान करत आहेत आणि त्याची त्यांना जराही खंत नसल्याने ते जाहीर माफी सुद्धा मागायला तयार नाहीत.
त्याचाच राग मनात ठेऊन पालघरचे महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांनी त्यांना सध्याच्या वस्तुस्थितीची जाणीव करून देताना म्हटलं की, ‘राम कदम मला खूप वाईट वाटलं, तुम्ही असं विधान नको करायला हवं होत की, तुम्हाला कोणती मुलगी आवडली तर सांगा, घरातून पळवून आणतो, तुम्ही एकाबाजूला चांगली कामं करता, परंतु तुमचे गुरु बदलले आणि त्याबरोबर तुमचे विचार सुद्धा बदलले, तुमचे आता जे गुरु आहेत ना ते एकदम घाणेरडे गुरु आहेत, त्यामुळेच तुम्हाला ही बुद्धी आली आहे, तुम्ही मनसेमध्ये होता तेव्हा तुम्ही असे नव्हता, असे बोलल्यावर राम कदमांनी फोन कट केला.
काय आहे ती ऑडिओ क्लिप;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं