Post Office Interest Rate | पोस्टाच्या 'या' योजनेत 1 लाखाच्या गुंतवणुकीवर होईल 27 लाखांचा नफा, फायदा घ्या - Marathi News
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Post Office Interest Rate
- पीपीएफमध्ये किती असते गुंतवणुकीची मर्यादा :
- असं उघडा पीपीएफ अकाउंट :
- टॅक्स बेनिफिटसह मिळते व्याजाची एवढी रक्कम :
- असे मिळतील 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 27 लाख रुपये :
- व्याजावर मिळेल व्याज :

Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये अनेक व्यक्ती पैसे गुंतवणे पसंत करतात. कारण की पोस्टाच्या अनेक योजना सुरक्षेसह चांगले रिटर्न मिळवून देतात. पोस्टाच्या एक नाही तर भरपूरसाऱ्या योजना तगडा व्याज मिळवून देण्यासोबतच टॅक्स सेविंगची सुविधा देखील प्रदान करतात. आज आम्ही पोस्टाच्या पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच PPF या योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेमध्ये तुम्ही लाखाची गुंतवणूक करून 27 लाखांपर्यंत पैसे कमवू शकता.
पीपीएफमध्ये किती असते गुंतवणुकीची मर्यादा :
पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही चांगल्या रिटर्नसह टॅक्स सेविंगचा फायदा देखील अनुभवू शकता. ही योजना 15 वर्षापर्यंत सुरू असते. त्यामध्ये प्रत्येक वर्षी तुम्ही 500 रुपयांपासून ते 1.50 लाख रुपयांपर्यंत पैशांची गुंतवणूक करू शकता.
असं उघडा पीपीएफ अकाउंट :
तुम्हाला पीपीएफ खातं उघडून योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जवळील बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खातं उघडावं लागेल. या खात्यामध्ये नाबालिकांसाठी त्यांचे पालक खातो उघडू शकतात. त्याचबरोबर या पोस्टाच्या योजनेमध्ये नियमांच्या आधारावर एक हिंदू अविभाजित परिवार (HUF) नावावर एकापेक्षा अधिक खाते उघडले जाऊ शकत नाही.
टॅक्स बेनिफिटसह मिळते व्याजाची एवढी रक्कम :
पीपीएफ योजनेमध्ये ग्राहकांना गुंतवणूक केल्यानंतर कलम 80C अंतर्गत पोस्ट ऑफिस कडून ग्राहकांनी जमा केलेल्या गुंतवणुकीच्या पैशांवर 7.1% व्याजदर ऑफर केले जाते.
असे मिळतील 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 27 लाख रुपये :
समजा एखाद्या व्यक्ती पीपीएफ योजनेमध्ये एकूण 15 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करत असेल तर प्रत्येक वर्षाच्या हिशोबाने आणि व्याजदराने तुम्हाला 7.1% व्याज मिळेल. म्हणजे यामध्ये गुंतवलेले पैसे 15 लाखांपर्यंत असतील. तर, यावर पंधरा वर्षानंतर तुम्हाला 12 ,12,193 रुपये इंटरेस्ट देण्यात येईल. म्हणजेच मॅच्युरिटीवर पूर्ण रक्कम 27 लाख 12 हजार रुपये एवढी रक्कम मिळेल.
व्याजावर मिळेल व्याज :
पीपीएफ योजनेमध्ये पैसे गुंतवणे अतिशय फायद्याचे मानले जाते. कारण की या योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज तीन महिन्यांच्या आधारावर बदलत राहते. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये कमी व्याजदर मिळाले तर, पुढील तीन महिन्यांमध्ये जास्त व्याजदर मिळण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्हाला व्याजावर व्याज मिळते. त्यामुळे तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा अनुभवायला मिळतो. एवढेच नाही जर तुम्हाला पैशांची जास्त गरज नसेल तर तुम्ही मॅच्युरिटी पिरेड संपल्यानंतर पुन्हा जास्तीचा फंड तयार करण्यासाठी अकाउंट वाढवून घेऊ शकता.
Latest Marathi News | Post Office Interest Rate 25 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं