Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News

Post Office MIS | पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ आतापर्यंत अनेक गुंतवणूकदारांनी घेतला आहे. यामधीलच अनेकांच्या मनपसंतीस उतरलेली आणि लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे ‘पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम’. पोस्टाच्या या भन्नाट योजनेतून तुम्ही प्रत्येक महिन्याला घरबसल्या पगार घेऊ शकता. पोस्टाची ही योजना 5 वर्षापर्यंत सुरू असते. यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9,250 रुपयांनी इतके पेन्शन स्वरूपात पैसे प्राप्त होऊ शकतात.
घरबसल्या पैसे कमवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल :
पोस्टाच्या मंथली इन्कम योजनेतून घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर, तुम्ही 9 लाखांची रक्कम गुंतवू शकतात. 9 लाखांची रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5550 रुपये प्रतिमहा मिळणे सुरू होईल. अशातच तुम्हाला 9,250 रुपये कमवायचे असतील तर, संयुक्त खात्यातून गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुम्हाला एकूण 15 लाखांची रक्कम गुंतवावी लागेल. जेणेकरून 5 वर्षांत 9,250 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील.
योजनेच्या व्याजदरा विषयी देखील जाणून घ्या :
पोस्टाची ही योजना सरकारद्वारे चालवली जाते. सरकारी योजना ऐकून अनेकजण यामध्ये डोळे बंद करून गुंतवणूक करतात. त्याचबरोबर चांगल्या व्याजदरास परताव्याची 100% हमी देणाऱ्या या योजनेने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दिला आहे. सरकार दरवर्षीप्रमाणे योजनेवर 7.4% ने व्याजदर देते. त्याचबरोबर खातेधारक मिळणाऱ्या व्याजावर प्रत्येक महिन्याला व्याज मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा दावा करत नसेल तर त्याला व्याज दिले जात नाही. दरम्यान या योजनेवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारण्यात येतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Post Office MIS 25 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं