Post Office Scheme | SBI बँकेपेक्षा पोस्टाच्या 'या' जबरदस्त योजनेत मिळते अधिक व्याज; मिळेल 7 लाखांपेक्षा अधिक रक्कम

Post Office Scheme | सध्या मार्केटमध्ये गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. अनेकजण आपले पैसे साठवून ठेवता बँकांमध्ये किंवा पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवून त्यावर सर्वोत्तम व्याजाचा लाभ मिळवत आहेत. एसबीआय बँकेत देखील बरेच गुंतवणूकदार FD मार्फत पैसे गुंतवतात आणि सर्वोत्तम व्याजाचा लाभ मिळवतात. परंतु पोस्टाची अशी एक योजना आहे जी एसबीआय बँकेच्या एफडी व्याजदरापेक्षा अधिक व्याजदर प्रदान करते. नेमकी कोणती आहे ही योजना पाहूया.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना :
आम्ही पोस्टाच्या टीडी म्हणजेच टाईम डिपॉझिट योजनेबद्दल माहिती सांगणारा. पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना ही बँकेतील एफडी योजनेप्रमाणेच असते. यामध्ये केवळ छोटे-मोठे बदल पाहायला मिळतात. परंतु पोस्टाच्या योजना या सरकारी योजना असल्यामुळे अनेकजण अगदी बेफिकरपणे गुंतवणूक करू शकतात. दरम्यान सध्याच्या घडीला पोस्टाच्या या योजनेमध्ये एसबीआय बँकेच्या एफडीपेक्षा देखील जास्तीत जास्त व्याज प्रदान केले जात आहे.
किती टक्क्यांनी मिळते जास्तीचे व्याज :
स्टेट बँक ऑफ इंडिया तिच्या एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिटवर 6.5% व्याजदर देते. या तुलनेत पोस्टाची 5 वर्षांची टाईम डिपॉझिटिव योजना 7.5% दराने व्याजदर प्रदान करते. पोस्टाच्या टाईम डिपॉझिटचा मॅच्युरिटी पिरियड हा केवळ 5 वर्षासाठी मर्यादित असतो. एसबीआय बँकेत एफडीवर 7.5% व्याजदर मिळत आहे परंतु ही सुविधा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादित आहे.
परंतु पोस्टाच्या TD योजनेमध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी सारखेच व्याजदर पाहायला मिळते. व्याजदर जास्त असल्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्ती सारख्याच प्रमाणात गुंतवणूक करून अधिकांश परतावा कमावू शकतात.
कॅल्क्युलेशन समजून घ्या :
समजा एखादा व्यक्ती एसबीआयच्या फिक्स डिपॉझिटमध्ये 5 लाखांची गुंतवणूक 5 वर्षांसाठी करत आहे आणि त्याचे वय 40 वर्ष आहे तर, 6.5% व्याजदराप्रमाणे त्याला 5 वर्षांत 6,90,209 रुपये परतावा मिळेल. परंतु व्यक्तीने त्याचवेळी पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिटि योजनेमध्ये गुंतवणूक केली असती तर, 5 वर्षांत 5 लाखांचे 6 नाही तर, 7,24,974 रुपये बनले असते. अर्थातच पोस्टाच्या टीडीमध्ये एसबीआयच्या एफडीपेक्षा 34,765 रुपये जास्तीचे मिळतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Post Office Scheme 30 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं