Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना

Post Office Schemes | पोस्ट ऑफिसकडून महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत पोस्टाच्या विविध योजनांमध्ये महिलांनी गुंतवणूक करून बक्कळ पैसा कमावला आहे. सामाजिक आणि सुरक्षिततेच्या बाबतीत पोस्ट ऑफिस महिलांसाठीच्या गुंतवणुकीसाठी आघाडीवर आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांना सर्वोत्तम व्याजदर मिळवून देणाऱ्या एकूण 4 योजनांविषयी माहिती सांगणार आहोत. या योजनांचे व्याजदर 8.2% टक्क्यांच्या घरात आहे.
राष्ट्रीय बचत पत्र :
राष्ट्रीय बचत पत्र ही महिलांसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमध्ये अत्यंत कमी जोखीम असते त्यामुळे सर्वसामान्य महिलांना देखील योजनेमध्ये पैसे गुंतवण्यास परवडतात. ही योजना तुम्हाला 7.5% व्याजदर देते. त्याचबरोबर सामान्य कुटुंबातील महिलांना देखील यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे कारण की, योजनेच्या गुंतवणुकीची लिमिट 100 रुपयांपासून सुरू होते. 5 वर्षांची ही योजना महिलांना बक्कळ पैसे कमावून देऊ शकते.
महिला सन्मान बचत पत्र :
महिला सन्मान बचत पत्र या योजनेची खास गोष्ट म्हणजे कोणत्याही वयोगटातील महिला या योजनेचा भाग होऊ शकते. योजनेमध्ये तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. परंतु हे 2 लाख रुपये तुम्ही एकाच वेळी एकाच व्यक्तीच्या खात्यामध्ये गुंतवू शकता. ही योजना तुम्हाला 7.5% व्याजदर प्रदान करते. व्याजदर जास्त असल्यामुळे तुम्हाला 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम मॅच्युरिटी पिरियडनंतर प्राप्त होते. योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जमा रक्कमेच्या 40% रक्कम गरजेसाठी काढून घेऊ शकता. या भन्नाट सुविधेमुळे ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.
सुकन्या समृद्धी बचत योजना :
सुकन्या समृद्धी योजना ही खास करून देशातील सर्वच लहान मुलींसाठी बनवली गेलेली योजना आहे. मुलींना शिक्षणासाठी त्याचबरोबर लग्न खर्चासाठी पालकांना निधी तयार करता यावा यासाठी ही योजना राबवली जाते. योजनेचा भाग होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीचे 10 वयवर्ष पूर्ण होण्याआधीच योजनेत पैसे गुंतवावे लागतील. केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला 8.2% व्याजदर प्रदान केले जाते. या योजनेबद्दल ही देखील माहिती लक्षात ठेवा की, योजनेचे व्याजदर प्रत्येकी तीन महिन्यानंतर बदलले जातात. सुकन्या समृद्धीची आणखीन एक फायद्याची गोष्ट म्हणजे गुंतवणूकदाराला यामध्ये सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स सूटचा लाभ अनुभवता येतो.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम :
पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीममध्ये देखील महिलांना जास्तीत जास्त परतावा मिळवता येतो. या योजनेमध्ये तुम्ही कमाल 1000 रुपयांची गुंतवणूक करून लाखो रुपयांचा फंड तयार करू शकता. कारण की योजनेचे व्याजदर 7.4% आहे. व्याजाचे दर चांगले असल्यामुळे महिला लवकरात लवकर श्रीमंतीच्या मार्गावर चालू शकतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Post Office Schemes Wednesday 11 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं