Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Senior Citizen Saving Scheme
- सरकारद्वारा 8.2% व्याज
- कसे मिळतील महिन्याला 20 हजार रुपये
- कोणी करावी इन्व्हेस्टमेंट?

Senior Citizen Saving Scheme | नोकरदारांसमोर रिटायरमेंटनंतर कसं आयुष्य जगायचं हा फार मोठा प्रश्न उपस्थित असतो. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या एका जबरदस्त स्कीम बद्दल सांगणार आहोत. ही स्कीम जेष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे. कारण की या योजनेमध्ये तुम्हाला वारंवार पैसे भरण्याची गरज नाही. तुम्ही एकदाच भली मोठी रक्कम गुंतवून रिटायरमेंटनंतर प्रत्येक महिन्याला 20,000 रुपयांनी एवढी पेन्शन मिळवू शकता.
सरकारद्वारा 8.2% व्याज
एवढेच नाही तर सरकारद्वारा 8.2% व्याज देखील दिले जाते. या योजनेचे नाव आहे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम. या स्कीम अंतर्गत जर तुम्ही 50000 पेक्षा जास्त रक्कम व्याजाची मिळत असेल तर, तुम्हाला टीडीएस भरावा लागणार. परंतु 15G/15H हा फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला कर सवलत मिळणार म्हणजेच टीडीएस भरावा लागणार नाही.
कसे मिळतील महिन्याला 20 हजार रुपये
समजा या स्कीममध्ये तुम्ही एकदम रक्कम 30 लाखांपर्यंत जमा केली तर, तुमच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम खात्यामध्ये प्रत्येक वर्षी 2,46,000 एवढी रक्कम फक्त व्याजाचीच मिळेल. या हिशोबाचे संपूर्ण कॅल्क्युलेशन पाहता तुम्हाला प्रत्येक महिन्याला 20,500 रुपये पेन्शन स्वरूपात मिळतील. 50 वर्षापर्यंत स्व इच्छेने रिटायरमेंट स्वीकारणाऱ्या व्यक्ती देखील या योजनेचा भाग होऊ शकतात.
कोणी करावी इन्व्हेस्टमेंट?
या खात्यामध्ये आधी पैसे जमा करण्याची रक्कम 15 लाख रुपयांपर्यंतच होती. परंतु आता तुम्ही 30 लाखांपर्यंत पैसे गुंतवू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक भारतवासी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय साठ वर्ष किंवा त्यापुढे असणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला या स्कीमवर 8.2% ने व्याजदर सुरू आहे.
Latest Marathi News | Senior Citizen Saving Scheme 13 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं