Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा

Smart Investment | पोस्टाच्या कोणत्याही योजनांमध्ये जोखीम अजिबात नसते. त्यामुळे नागरिकांना पोस्टाच्या विविध योजनांमध्ये आपले पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे वाटते. अशीच एक पोस्टाची टीडी म्हणजे टाईम डिपॉझिट नावाची योजना. ती योजना तुम्हाला चांगले व्याजदर प्रदान करते. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या टीडीमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असता वेगवेगळ्या वर्षांत किती परतावा मिळेल याची माहिती सांगणार आहोत.
वर्ष आणि मिळणारे व्याजदर जाणून घ्या :
सर्वप्रथम आपण पोस्टाच्या टाईम डिपॉझिटवर किती वर्षांसाठी एवढे व्याजदर ठेवले आहे हे जाणून घेऊया. पोस्टाच्या या सेविंग स्कीममध्ये 1 वर्षासाठी 6.9% व्याजदर मिळत आहे. कोणताही गुंतवणूकदार पोस्टाच्या टीडी योजनेमध्ये एक ते पाच वर्षांपर्यंत पैशांची गुंतवणूक करू शकतो. त्याचबरोबर दोन वर्षांच्या कालावधीमध्ये 7.0%, 3 वर्षांसाठी 7.1% आणि 5 वर्षासाठी 7.5% व्याजदर दिले जात आहे.
1 ते 5 वर्षांमध्ये 1 लाख रुपये गुंतवण्याचे मूल्य किती असेल :
1. एका वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवले तर, तुम्हाला केवळ व्याजाचे 7,080 रुपये मिळतील. म्हणजेच मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम 1,07,080 रुपये असेल.
2. एखाद्या व्यक्तीने पोस्टाच्या टीडी योजनेमध्ये 2 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर, केवळ दोन वर्षांच्या व्याजाचे 14,888 रुपये मिळतील. म्हणजेच मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम 1,14,888 रुपये असेल.
3. एखाद्या व्यक्ती पोस्टाच्या टीडी योजनेत 3 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करत असेल तर, तो केवळ व्याजाने 23,508 रुपयांची कमाई करेल. म्हणजेच मॅच्युरिटीवर त्याला 1,23,508 रुपये मिळतील.
4. पोस्टाच्या टीडी योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवून ठेवली असेल तर, 5 वर्षांच्या व्याजदराप्रमाणे केवळ व्याजाचे 44,995 रुपये मिळतील. मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम 1,44,995 रुपये असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Smart Investment 18 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं