आधारकार्ड मतदानासाठी चालतं पण नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी नाही? राज ठाकरे

पुणे: सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सध्या देशात आर्थिक मंदीचं वातावरण आहे. अजून आपल्याला मंदीचा सामना करायचा आहे. देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरुन नागरीकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी सारखे मुद्दे समोर आणले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हे करुन दाखवलं असे राज ठाकरे म्हणाले. आधारकार्ड मतदानासाठी चालू शकते मग नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी आधारकार्ड का चालू शकत नाही? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. आधारकार्डासाठी लोकांना तासनतास रांगेत उभं केलं त्याचा उपयोग काय? असा सवाल राज यांनी केला.
एनआरसी आणि कॅब या विषयाला वेगवेगळे कंगोरे आहेत. आज देशात जे मोर्चे निघत आहे, दंगेसदृश स्थिती आहे, जाळपोळ होत आहे, यातील किती जणांना हे माहिती आहे याबद्दल शंका आहे. या कायद्याबद्दल अमित शाह यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप हुशारीने आर्थिक मंदीवरील लक्ष हटवत याकडे गुंतवून ठेवलं. जर आधार कार्ड आणि मतदान कार्डावर मतदान करता येतं, तर मग नागरिकत्व सिद्ध का करता येत नाही?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
नागरिकत्व कायद्याचं भारतीय जनता पक्षाने देखील राजकारण करू नये आणि राजकीय पक्षांनी विनाकारण राजकारण करू नये, स्थानिक मराठी मुस्लिम कधीच आंदोलन करत नाही. इथल्या लोकांच्या चिंता आधी मिटवा, बाहेरून आलेल्या लोकांसंदर्भात पोलिसांना माहिती आहे. पण पोलिसांचे हात बांधलेले असल्यानं ते कारवाई करू शकत नाही. बाहेरच्या लोकांना पोसण्याची गरज नाही. बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या लोकांना हाकललं पाहिजे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं