अहिल्यादेवी होळकर उद्यानातील दीड एकर जागेवर मुलांना हक्काचं मैदान; मनसे तयारी सुरु

कात्रज: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे यांनी त्रज, संतोषनगर, दत्तनगर, मोरे बाग भागातील मुलांसाठी हक्काचे मैदान मिळाले यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून, त्यावर त्यांचे विशेष लक्ष देखील आहे. नगरसेवक वसंत मोरे यांचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांच्याबाबतीत चांगलाच बोलबाला आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेक विकास कामं वेळेत पूर्ण करून स्वतःची वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे.
त्यानुसार या वर्षीच्या उन्हाळ्यात कोणत्याही परिस्थितीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानातील दीड एकर जागेवर कात्रज, संतोषनगर, दत्तनगर, मोरे बाग भागातील मुलांसाठी हक्काचे मैदान तयार होणारच असा निश्चय नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे. त्यासाठी एकूण ३ जेसीबी लावून काम पूर्ण करण्याची जोरदार तयारी सुरु आहे.
या वर्षीच्या उन्हाळ्यात कोणत्याही परिस्थितीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानातील दीड एकर जागेवर कात्रज, संतोषनगर, दत्तनगर, मोरे बाग भागातील मुलांसाठी हक्काचे मैदान तयार होणार. आज त्यासाठी ३जेसीबी लावून काम पूर्ण करत आणले. अजून एक पाऊल वेगळ्या विकासकामाकडे! pic.twitter.com/fF1gvJktwC
— Vasant More (@vasantmore88) December 24, 2019
मनसे नगरसेवक वसंत मोरे आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदारपणे तयारीला लागले असून विकास कामांसोबत त्यांनी स्थानिक पातळीवर पक्ष वाढीवर देखील लक्ष केंद्रित केलं असून, तरुणांना मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश देखील दिले जात आहेत.
आज जे माझ्या समोर बसलेत त्यापैकी बरेच जण २०२२ ला नगरसेवक म्हणून माझ्या शेजारी बसलेले असतील. pic.twitter.com/eAOeO2gaF7
— Vasant More (@vasantmore88) December 22, 2019
पक्षवाढीसाठी काहीही, कधीही आणि कुठेही! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तरूण कार्यकर्ते एक सक्षम पर्याय म्हणून पाहत आहेत. pic.twitter.com/feXlN9Z49I
— Vasant More (@vasantmore88) December 22, 2019
Web Title: MNS Corporator Vasant More took initiate for Katraj road playing ground for children.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं