स्वकीयांनी ताकत दिली नाही, पण पवार साहेबांनी ऊर्जा दिली: मनसे नेत्या रुपाली पाटील

बारामती: पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला नेत्या रुपाली पाटील यांनी आज (सोमवार) दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील गोविंदबागेत आज पवार कुटुंबीय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत असताना मनसेच्या रुपाली पाटील यांनीही शरद पवार व अजित पवार यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी रुपाली पाटील म्हणाल्या, की स्वकीयांनी ताकत दिली नसली तरी जी ऊर्जा पवार साहेबांनी दिली. ती प्रेरणादायी आहे. लेक म्हणूण त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. हरता हरता जिंकता येत हे पवार यांच्याकडून शिकायला मिळालं. मी त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यापूर्वी मी कधी बारामतीमध्ये आले नाही. आजचा उत्साह पण एक ऊर्जा मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीत रुपाली पाटील या कसबा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आणि अजय शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आल्याने त्या प्रचंड नाराज होत्या. अजय शिंदे यांना तिकीट जाहीर होताच त्यांनी मुंबईला धाव घेत राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, काहीच पदरी न पडल्याने त्या मागील काही दिवसांपासून नाराज असल्याचं वृत्त होतं. दरम्यान, निकालानंतर मनसेची पुण्यातील स्थिती बिघडली असली तरी राष्ट्रवादीची पुण्यासह एकूण पश्चिम महाराष्ट्रातील स्थित चांगली झाल्याने इतर पक्षातील नाराजांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
त्यात कोथरूड आणि हडपसरच्या जागा मनसे जिंकेल अशी शक्यता असताना त्यादेखील जागा हातातून निसटल्या आहेत. हडपसरची जागा राष्ट्रवादीच्या हाती आली आहे. त्यामुळे सध्या नाराज असलेल्या रुपाली पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर तर नाहीत ना अशी चर्चा रंगली आहे. तसेच यापुढे त्या अजून पुण्यातील काही लोकांना पक्षातून स्वतःसोबत घेऊन जाणार का यावर पक्षातील स्थानिक नेत्यांची नजर असल्याचं समजतं. मनसेच्या पुण्यातील वरिष्ठ नेते मंडळींची उमेदवारांना हवी तशी मदत झाली नाही आणि त्यांची एकूण रणनीतीच चुकीची होती अशी खंत अनेकांनी बोलून दाखविण्यास सुरुवात केली आहे . तसेच नाराजी उघडपणे समाज माध्यमांवर सुरु झाली असून, त्याचे अजून कोणते परिणाम समोर येणार ते पाहावं लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं