पुणे: चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या; कोथरूडमध्ये आघाडीचा मनसेला पाठिंबा

पुणे: भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांनी स्वतःची वर्णी लावली आहे. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांना संताप व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात दुसरी भर म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण समाजाने देखील आक्षेप नोंदवला होता.
मागील काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांच्याविरूद्ध स्थानिकांनी बॅनरबाजी सुरु केल्याचे देखील पाहायला मिळत आहे. तसेच उमेदवार स्थानिक नसल्याने देखील अनेकांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील पैसे देऊन गर्दी जमावल्याचा आरोप अनेकांनी केला असून त्यासंबंधित व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते.
निवडणुकीपूर्वीच चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना राजकारणातून संपण्याची वक्तव्य केली होती. त्यामुळे आघाडीतील पक्ष देखील आता चंद्रकांत पाटील यांना घेरण्याचा तयारीत आहेत. त्याचाच भाग म्हणजे आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूडचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि काँग्रेस नेते अभय छाजेड यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जाहीर पाठींबा देण्याची घोषणा केली आहे. सर्व विरोधक एकवटल्याने चंद्रकांत पाटील यांची निवडणुकीतच कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं