महत्वाच्या बातम्या
-
जर तरच्या शक्यतांवर पोलीस तपास करत नाहीत | अशा प्रकरणांमध्ये गुन्हा मानूनच तपास करतात
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण हे आत्महत्येचे आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलीस नेहमी गुन्हा मानूनच तपास करतात, असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
तडीपार गुंडाचा हातात कोयता घेऊन डान्स | पुण्यातील घटना
तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच शिवजयंतीच्या दिवशीची ही घटना असल्याची माहिती आहे. गुंड रोशन लोखंडे याने हातात कोयदा घेऊन दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा तरुणांसाठी ‘सारथी’अंतर्गत मोफत कोर्सेस | अधिक माहितीसाठी वाचा
मराठा समाजातील युवक ‘जॉब स्किल रेडी’ व्हावेत या उद्देशाने ‘सारथी’मार्फत (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मराठा, कुणबी समाजाच्या तरुणांना याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध कोर्सेसचा लाभ घेता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील गृहमंत्र्यांकडून याची चौकशी करावी - रुपाली चाकणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत शंका घेत जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असा इशारा राज्य सरकारला दिला. त्यावरुन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मनसेची खिल्ली उडवली.
4 वर्षांपूर्वी -
राज भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली | सर्वपक्षीय नेत्यांकडून आभार व्यक्त
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी तेथील नागरीकांच्या वतीनं करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत आहेत. परंतु हे कंत्राट अकरा वर्षासाठी असल्याने ते मागे घेता येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. याच विषयावरुन पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे गेले होते.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी | मोठ्या कार्यक्रमांवर निर्बंध
राज्यात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या पार्श्वभूमिवर सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या पातळीवर निर्बंध लादण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.पुण्यामध्ये आज कोरोनाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.पुण्यात रात्रीची संचारबंदी अर्थात नाईट कर्फ्यु लावण्यात आलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | सीमा रस्ते संघटना पुणे | 459 पदांसाठी भरती
BRO Recruitment 2021 : सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर, स्टोअर कीपर टेक्निकल पदांच्या एकूण 459 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर 45 दिवसात अर्ज सादर करावे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी आणि शिवसेना | नव्या युतीचे संकेत | कारण ठरतील आगामी पालिका निवडणुका
राज्यात शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडी असाच इतिहास राहिला आहे. मात्र भविष्यात राज्यात वेगळीच युती आणि आघाडी जन्म घेऊ शकते अशी शक्यता आहे. भविष्यातील निवडणुका विशेष करून लोकसभा आणि विधानसभा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवतील अशी दाट शक्यता आहे. राज्यातील दोन बलाढ्य पक्ष एकत्र आल्याने राजकिय समीकरणं बदलण्याची शक्यता यापूर्वी देखील वर्तविण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
क्रिकेट खेळताना खेळाडूचा मृत्यू | हार्टअटॅक ठरलं कारण | काही महिन्यांपूर्वी झाला होता कोरोना
पुण्यात एका क्रिकेट खेळाडूचा लाइव्ह मृत्यू मोबाईलमध्ये कैद झाला आहे. डॉक्टरांनुसार, क्रिकेट खेळताना त्याला हार्टअटॅक आला आणि तो मैदानात पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणी आणि सोशल मीडियावरील न्यायाधीश लोकांनो थोबाड बंद करावे - रुपाली पाटील
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा आणि अरूण वर्गमित्र होते | पण क्लिपमधील आवाज अरूणचा नाही | ग्रामस्थांचा दावा
परळी येथील मूळ रहिवासी युवती पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा, आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आता पुढे येत असून विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, हे प्रकरण लक्षपूर्वक पाहिले तर यात आतापर्यंत बरीच गुंतागुंतीची माहिती आणि खुलाशे समोर येत असल्याने हे प्रकरण नेमके काय ?हे स्पष्ट होत नाहीये. त्यानंतर तिचे कुटुंबीय पुढे येऊ लागल्याने वास्तव समोर येण्यास सुरुवात झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजित पवारांच्या इलेक्टिव्ह मेरिट शब्दप्रयोगाने पुणे भाजपला धडकी | लोटसच्या ऑपरेशनची तयारी?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्यांना वाजत पक्षात घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. पवार यांच्या भूमिकेमुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गोटात मात्र पुन्हा एकदा कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी १९ नगरसेवकांवर ‘वॉच’ ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांसह महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकारी न बदलण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे काही ज्येष्ठ नगरसेवक नाराज आहेत. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत दगाफटका होऊ नये याकरिता भारतीय जनता पक्ष अधिक सतर्क झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली | पोलीस जबाबात माहिती
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागवला आहे. यावर पुणे पोलिसांनी “पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असे सांगतानाच कायदेशीर अडचणींमुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही”, असे स्पष्टीकरण दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिच्या अंगावर पोल्ट्री फार्मचं कर्ज | २५ लाखाच्या नुकसानामुळे ती त्रस्त होती - वडिलांची प्रतिक्रिया
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना विरोधकांनी लक्ष केलं आहे. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केली असं सांगून याला जातीय वळण देखील देण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
परळीत राहून २ वर्षे भाजपमध्ये काम | पण त्यानंतर राजकीय कलाटणी...
मागील २-३ दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात पुजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्म्हत्येवरून राजकरण तापलं आहे… याचं कारण असं की यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव येत आहे… तसेच काही ऑडियो क्लिप देखील वायरल झाल्या आहेत…या सगळ्यात भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे… आणि सरकारनं लवकरात लवकर या विषयावर करवाई करावी अशी मागणी केली आहे. पुण्याच्या वानवडी येथील पूजा चव्हाण नावाच्या २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली. पण तिच्या आत्महत्येला आता राजकीय वळण मिळालंय. तिच्याबाबत आता अनेक खुलासे समोर येऊ लागलेत. ती नेमकी पुण्यात का आली होती?
4 वर्षांपूर्वी -
भाजपला मनसेसोबत युतीची आशा? | भाजपकडून पुन्हा त्याच मुद्यावर भाष्य
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने स्वबळाची भूमिका घेतली आहे आणि त्यानुसार पक्ष विस्तार सुरु केला आहे. विशेष म्हणजे आज पर्यंत मराठी माणूस केंद्रस्थानी असणाऱ्या मनसेमध्ये इतर पक्षातील उत्तर भारतीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश केल्यानंतर समाज माध्यमांवर मोठी चर्चा रंगल्याच पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
ईडीची मोठी कारवाई | अविनाश भोसलेंचे चिरंजीव अमित भोसलेंना ताब्यात घेतलं
रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने (ED) धाड टाकून चौकशी सुरु केली आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर ईडीने अविनाश भोसले यांचा मुलगा अमित याला ताब्यात घेतलं आहे. इतकंच नाही तर अमित भोसले यांना अधिक चौकशीसाठी पुण्यावरुन मुंबईला आणल्याचंही सांगण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
विदेशी चलन प्रकरण | बिल्डर अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ची धाड
बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने छापेमारी केली आहे. ED चे अधिकारी सकाळी 8:30 पासून ABIL हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. फेमासंबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हे 6 वर्षांपूर्वीचे विदेशी चलन प्रकरण आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mhada Lottery | पुणे विभागातील म्हाडाच्या घरांचा ऑनलाईन निकाल पाहा Live
म्हाडाच्या पुणे विभागाच्या 5647 घरांसाठी आज सोडत जाहीर केली जाणार आहे. यामध्ये अनेकांची पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील घरांचा समावेश आहे. दरम्यान यंदा देखील ही लॉटरी सोडत अर्जदारांना ऑनलाईन पाहता येणार आहे. नेहरू मेमोरियल हॉलमध्ये या म्हाडा घरांच्या लॉटरीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी अधिकाधिक अर्जदारांनी त्याच वेबकास्टिंग पहावं असं आवाहन करण्यात आले आहे. भाग्यवान विजेत्यांना घरबसल्या निकाल पाहण्याची सोय यंदा देखील उपलब्ध असेल. सोबतच ज्यांना या सोडतीमध्ये घर लागणार आहे त्यांना ई मेल, एसएमएस या द्वारा माहिती मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
सीरमच्या इमारतीला भीषण आग | ५ जणांचा होरपळून मृत्यू | आरोग्यमंत्र्यांची माहिती
सीरमच्या इमारतीला भीषण आग लागलेली असून, इमारतीत पाच जणांचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. आग लागलेल्या इमारतीमध्ये पाच मृतदेह सापडलेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. तसेच तीच माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील दिली आहे.
4 वर्षांपूर्वी