महत्वाच्या बातम्या
-
पुण्यात कोरोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार
मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांवर आता रुग्णालयाऐवजी घरीच उपचार केले जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींवर पुण्यात हल्ला
भारतीय जनता पार्टीच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील सहजानंद सोसायटी भागात दारु पित बसलेल्या तरुणांना जाब विचारणाऱ्या दोघा व्यक्तींवर पहिले हल्ला करण्यात आला. याच परिसरात राहत असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळावर जाऊन काय झालं म्हणून विचारणा केल्यानंतर त्यांच्यावरही दारु पिणाऱ्या तरुणांनी हल्ला केला.
5 वर्षांपूर्वी -
पुण्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस
पुणे शहरात पावसाची शक्यता निर्माण झाली असून वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट ऐकू येत आहे. पुणे वेधशाळेनं कालच याबाबत इशारा दिला होता. सकाळपासूनच शहरातील उकाड्यातही वाढ झाली होती, त्यानंतर संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास शहरात अचानक अंधारुन आलं आणि ढगांचा गडगडाटही सुरु झाला.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश उपाध्यक्षाला ५० कोटीच्या खंडणी प्रकरणात अटक
पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना काही दिवस आधी समोर आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
तामिळनाडू'नंतर महाराष्ट्रात समूह संसर्गाला सुरुवात; रुग्णाची प्रकृती चिंताजनक
पुण्यात ४२ वर्षांच्या एका महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या महिलेवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूची लागण झालेल्या महिलेचा परदेश प्रवासाचा काहीच इतिहास नाही. तसंच तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने परदेशात प्रवास केलेला नाही. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: अघोषित संचारबंदी लागू असताना पुणे स्टेशनवर प्रचंड गर्दी; डोकेदुखी वाढणार
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि ठाणे येथील कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आणखी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यात आणखी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. तीनपैकी प्रत्येकी एक जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईतील आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता ५२ झाली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
बंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत लागू - उपमुख्यमंत्री
कोरोना व्हायरसच्या आपण सध्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र, येणारा काळ कठीण आहे. गर्दी कमी झाली नाही तर बस आणि रेल्वे सेवाही बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटाविरोधात राज्य सरकार सगळ्या उपाययोजना करत आहेत. यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात तळीराम सर्वात आधी सावध होते; बोर्ड वाचूनच आपत्कालीन स्टॉक करून ठेवला
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील मद्यविक्रीची दुकाने ३० मार्चपर्यंत बद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तारांकित हॉटेल्सना यातून वगळण्यात आले असून १८ मार्चपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. कायद्याचे उल्लंघन करुन मद्य विक्री करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकांच्या भीतीचा फायदा घेत कोरोनावरील उपचारासाठी बोगस गोळ्यांची विक्री
‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात आणखी एक रुग्ण; राज्यातील 'कोरोना' रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला
‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं निधन
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं मंगळवारी पुण्यात निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. शाळेत असल्यापासूनच जयराम यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश ठरला. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल खंडणी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात
पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविणार असल्याचे सांगितले जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण; महापालिकेकडून २०० खाटांचं रुग्णालंय सज्ज
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला असून पुण्यात दोन रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनाही नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. करोना कक्षात त्यांना ठेवण्यात आलं आहे. दरम्यान करोनाचे रुग्ण आढळल्याने शहरात चिंतेंचं वातावरण असून पूर्वकाळजी म्हणून आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची सूचना देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शाळा चित्रपटात ब्राह्मण कलाकार होते; तेव्हा गतीमंद झोपला होता का? आनंद दवे
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके याने केलेल्या विधानावरुन सध्या मराठी मनोरंजन विश्वात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. “मराठी मनोरंजन श्रेत्रातील प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?”, असा सवाल ‘केसरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके याने उपस्थित केला. ‘लोकसत्ता’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे विधान केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : समुद्राच्या तळातून पिस्तूल शोधण्यात सीबीआयला यश
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा पुरावा हाती आला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अरबी समुद्राच्या तळातून एक पिस्तूल शोधून काढले आहे. हेच पिस्तूल दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आले असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. समुद्रात पोहोण्यात निष्णात असलेल्या नॉर्वेतील जलतरणपटूंनी अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल शोधून काढले.
5 वर्षांपूर्वी -
टीकेची पातळी घसरली; मिटकरींकडून पोंक्षेवर थेट आजारपणावरून बोचरी टीका
दोन दिवसांपूर्वी ‘मी सावरकर’ या कार्यक्रमासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये मोठी गर्दी उसळली होती. अभिनेते शरद पोंक्षे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांनी पोंक्षे यांचा निषेध केला होता. ‘देश गोडसेवादी की गांधीवादी’, ‘गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध’, असे फलक घेऊन विद्यार्थी आपला निषेध नोंदवत होते. त्यावेळी स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्या सर्वांना नंतर ताब्यात घेतले होते.
5 वर्षांपूर्वी -
पोंक्षे! म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय; पण तुमची हलकट..? काय म्हणाले मोटकरी?
दोन दिवसांपूर्वी ‘मी सावरकर’ या कार्यक्रमासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये मोठी गर्दी उसळली होती. अभिनेते शरद पोंक्षे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांनी पोंक्षे यांचा निषेध केला होता. ‘देश गोडसेवादी की गांधीवादी’, ‘गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध’, असे फलक घेऊन विद्यार्थी आपला निषेध नोंदवत होते. त्यावेळी स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्या सर्वांना नंतर ताब्यात घेतले होते.
5 वर्षांपूर्वी -
देश गोडसेवादी की गांधीवादी! शरद पोंक्षेंच्या विरोधात घोषणाबाजी; विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
‘मी सावरकर’ या कार्यक्रमासाठी आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये मोठी गर्दी उसळली. अभिनेते शरद पोंक्षे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी पोंक्षे यांचा निषेध केला. ‘देश गोडसेवादी की गांधीवादी’, ‘गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध’, असे फलक घेऊन विद्यार्थी आपला निषेध नोंदवत होते. स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना अटक
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: भोंदू बाबाकडून ५ बहिणींचं लैंगिक शोषण, पूजेच्या नावाखाली मुलींना नग्न करायचा
अघोरी प्रथा आणि जादूटोणाकरून पैसे उकळण्याचे आणि महिला अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. पुजेच्या नावाखाळी महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलिसांनी ताब्यात धेतलं आहे. महिलांना नग्न करून त्यांच्या शरीरावर लिंबू पिळून चोळणं असं धक्कादायक प्रकार तो करायचे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी