महत्वाच्या बातम्या
-
कोरेगाव भीमा : शरद पवार यांची देखील साक्ष नोंदवणार
भीमा- कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष देण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. आयोगाचे अध्यक्ष न्या. जे. एन. पटेल यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी एसआयटीतर्फे कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सत्ता आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून चुकीच्या लोकांना यामध्ये गुंतविण्यात आलं असल्याचे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: इंदुरीकर महाराज महिलांचा आदर करतात की अपमान? हा व्हिडिओ 'मनसे' पहाच
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती.
5 वर्षांपूर्वी -
आता बस्स! प्रचंड गोष्टी सहन केल्या, तु ये काळं फासायला मग तुझं?...रुपाली पाटील संतापल्या
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती.
5 वर्षांपूर्वी -
एल्गार परिषद: पवारांना तत्कालीन युती सरकारच्या भूमिकेवर संशय; युतीतल्या सेनेचा विसर?
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. भीमा कोरेगाव आण एल्गार परिषद हे दोन वेगळे कार्यक्रम आहे. यामध्ये उलटसुलट चर्चा होत असल्याचं शरद पवार म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राला कदापिही देणार नाही: मुख्यमंत्री
राज्यात गेल्या काही दिवसांपासून एल्गार परिषदेबरोबरच कोरेगाव भीमा प्रकरण चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेसंदर्भातील तपासावर संशय व्यक्त केला होता. याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, हा याप्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं एनआयएकडे दिला. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. “कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडं दिलेला नाही. देणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचा भगवा फडकला आणि पुणे कात्रजमधील बच्चे कंपनीची 'फुलराणी' पुन्हा धावली
लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली पेशवे उद्यानातील फुलराणी मिनी ट्रेन २०१४ मध्ये कात्रजमध्येही धावण्यास सुरुवात झाली होती. कात्रज परिसरातील आजी-आजोबा उद्यानातील ५०० मीटरच्या ट्रॅकवर धावणाऱ्या ‘फुलराणी’च्या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने ५३ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चाला मे २०१४ मध्ये मंजुरी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
एल्गार परिषद: प्रकरण फ्रॉड असल्याचं बोलायची मुख्यमंत्र्यांकडे हिंमत नाही: प्रकाश आंबेडकर
भीमा-कोरेगाव प्रकरणाचा खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाकडे वर्ग करण्यास पुणे सत्र न्यायालयाने मंजुरी दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टाने यासंबंधी आदेश दिला. पुणे न्यायालयाने तसे ‘ना हरकत’ पत्रही दिले आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींना येत्या २८ फेब्रवारी रोजी मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर उभे करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत होते. अचानक केंद्र सरकारने हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेत एनआयएकडे दिला होता.
5 वर्षांपूर्वी -
एल्गार परिषद खटला मुंबईतील विशेष NIA कोर्टाकडे वर्ग; पुणे सत्र न्यायालयाची मंजुरी
भीमा-कोरेगाव प्रकरणाचा खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाकडे वर्ग करण्यास पुणे सत्र न्यायालयाने मंजुरी दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टाने यासंबंधी आदेश दिला. पुणे न्यायालयाने तसे ‘ना हरकत’ पत्रही दिले आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींना येत्या २८ फेब्रवारी रोजी मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर उभे करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत होते. अचानक केंद्र सरकारने हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेत एनआयएकडे दिला होता.
5 वर्षांपूर्वी -
पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार; सोशल मीडियावरील कमेंटचा आधार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रकार भाऊ तोरसेकर आणि ‘पोस्टमन’ या पोर्टलवर कमेंट करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवार साहेबांमुळे कायमची सकाळी लवकर उठायची सवय लागली: अजित पवार
‘काम चांगलं झालं तर किरकोळ चुका देखील पोटात घेऊ, पण कामं झाली नाहीत, तर साईड पोस्टिंगचा पर्याय वापरू,’ असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना भरला. पुणे शहरातील चुकलेल्या उड्डाणपुलांच्या बाबतीत काही तरी निर्णय घ्यावाच लागले, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे म्हणाले “संजय बरा बोलतो, येतो का मनसेत”: सविस्तर वृत्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील इंक अलाईव्ह कार्यशाळेचे उदघाटन झाले. बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी याठिकाणी फार फार तर दीड मिनिटं बोलण्यासाठी आलो आहे. आज याठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे पालक असायला पाहिजे होते. मी केवळ आणि केवळ व्यंगचित्राचा कार्यक्रम असल्यामुळे मी पुण्यात आलो आहे. माझं दुसरं कोणतंही काम नाही”.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने ५५ गाड्यांची तोडफोड
महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा गुंडांचा उच्छाद पाहायला मिळाला आहे. गुंडांनी दहशत निर्माण करण्यासाठी पुण्यातील सहकारनगर भागात जवळपास ५५ गाड्यांची तोडफोड केली आहे. यात रिक्षा आणि दुचाकींचा समावेश आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असून पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पुणेकरांनी 'आफ्टरनून लाइफ'चं वक्तव्य विनोदाने घ्यावे: आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘प्लास्टिक वापर बंदीबाबत पुणे चांगली भूमिका बजावत आहे, इकोफ्रेंडली वातावरणासाठी पुणे चांगली दिशा दाखवू शकते. पुण्यात ज्या प्रकारे कापडी पिशव्यांचा बांबूच्या वस्तूंचा वापर केला जातो, त्या गोष्टी राज्यात किंबहुना देशातही सगळीकडे व्हायला हव्यात.पुण्याला कार्बन मुक्त करण्यासाठी २०३० टार्गेट आहे, परंतु पुणे २०२५ मध्ये ते पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. महाविकास आघाडीचं सरकार पर्यावरणासाठी सकारात्मक आहे. जगातील बेस्ट प्रॅक्टिस राज्यात आणणार असंही नमूद करायला ते विसरले नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल; मुनगंटीवार यांचा इशारा
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी विशेष चौकशी पथकामार्फत (SIT) या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र २५ जानेवारीला हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रलायने एनआयएकडे सोपवले.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमा: तपासासाठी एनआयएचे पथक पुण्यात; पुणे पोलिसांचं सहकार्य नाही
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी विशेष चौकशी पथकामार्फत (SIT) या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र २५ जानेवारीला हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रलायने एनआयएकडे सोपवले.
5 वर्षांपूर्वी -
मरणारा मासा तडफडतो, हे पुन्हा एकदा दिसलं; रुपाली चाकणकरांची मोदी सरकारवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली असून सुरक्षा हटवण्याआधी केंद्र सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असं सांगण्यात येत आहे. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात होते.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे पुन्हा चांगल्या प्रकारे काम करतील: अमृता फडणवीस
“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षासाठी आता नवीन दिशा ठरवली आहे. ते पुन्हा चांगल्या प्रकारे काम करतील,” अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मांडली. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी त्यांना अनेक विषयांवर भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे चांगलं काम करतील असं त्या म्हणाल्या.
5 वर्षांपूर्वी -
पुणेकरांचा दुपारी 'झोपा आणि झोपू द्या' नियम; आदित्य यांना 'नाईट लाईफ' प्रस्तावाची अपेक्षा? सविस्तर
२६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. अशातच पुण्यातही नाईट लाईफ संकल्पनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला भीषण अपघात
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी हे अपघातात जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना झाली.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: कात्रज गावठाण रस्ता चकाचक; नगरसेवक वसंत मोरेंचा विकास कामांचा धडाका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज गावठाण जुन्या बस स्टॉप समोरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण केल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वर्दळीच्या मार्गावरील वाहनांना देखील विस्तृत रस्ता उपलब्ध झाला आहे.
5 वर्षांपूर्वी