महत्वाच्या बातम्या
-
सांगली बंद यामागे काहीतरी राजकीय षडयंत्र दिसतंय: सुप्रिया सुळे
एनसीपी’च्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी शुक्रवारी पुकारलेल्या सांगली बंदवर खोचक टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्यांच्यासाठी ‘बंद’. हे जरा चुकीचे वाटतं… यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसतंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर असं करणं हे योग्य वाटत नाही. संजय राऊत यांनी कालच त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे. त्यामुळे ती चर्चा न करता राज्यात आज अनेक गंभीर प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
डीएसके'मधील ठेवीदाराची आत्महत्या; ठेवीदार पुण्यातील 'शिवसैनिक'
डीएसके अर्थात डीएस कुलकर्णी यांच्या एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके असे या ठेवीदाराचे नाव होते. तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडी येथील भीमनगर परिसरात राहात होते. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी डीएसकेमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु, गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याने तानाजी यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले आहे. तानाजी कोकरे शिवसैनिक होते. तानाजी यांचे एक पत्र सापडले असून त्यावर शेवटी शिवसैनिक….जय महाराष्ट्र! असा उल्लेख आहे. कोरके यांच्या पश्चात चार मुली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; अपघात बाप-लेकीचा जागीच मृत्यू
यात्रेसाठी गावी जाणाऱ्या बाप-लेकीवर वाटेतच काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तीन वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीवरील पुलावर शनिवारी ही घटना घडली. या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
'त्या' प्रश्नावर पुन्हा संधी मिळाली आणि फडणवीस म्हणाले ‘मी पुन्हा येईन!
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच त्याच विधानाचा पुनरुच्चार करून विधानसभा निवडणूक लढविली. निकालानंतर ते पुन्हा आले पण अल्पावधीतच त्यांचे सरकार कोसळले.. आणि महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करून फडणवीस यांचे मी पुन्हा येईन”चे स्वप्न वास्तविकदृष्ट्या भंग पावले. मात्र तरीही त्यांनी चिंचवड येथे एका कार्यक्रमात मी पुन्हा येईन, पण…असे म्हणून सर्वांचीच उत्सुकता वाढविली.
5 वर्षांपूर्वी -
'सारथी'च्या बचावासाठी खासदार छत्रपती संभाजीराजेंचं पुण्यात उपोषण
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी आगरकर रस्त्यावरच ठिय्या देत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या वेळी सारथीला मोठ्या प्रमाणात निधी द्या, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर कारवाई करा, असे फलकही आंदोलकांनी झळकविले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेही उपोषणाला बसलेत.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकचा हर्षवर्धन ठरला यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'
केसरी स्पर्धेची अंतिम लढत चांगलीच अटीतटीची झाली. कारण या सामन्यात पहिला गुण शैलेश शेळकेने पटकावला होता. त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने एक गुण मिळवत बरोबरी केली होती. त्यानंतर सामन्याला एक मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धन सदगीर १-२ अशा पिछाडीवर होता. पण अखेरच्या 20 सेकंदात हर्षवर्धनने खेळ पालटविला, हर्षवर्धनने तिहेरी पट काढून 2 गुण घेतले आणि बाजी मारली. हर्षवर्धनने अंतिम लढतीचा सामना ३-२ असा जिंकत जेतेपद पटकावले.
5 वर्षांपूर्वी -
JNU हल्ला: मोदी आधुनिक हिटलर तर शाह तडीपार’; पुण्यात विद्यार्थ्यांची पोस्टरबाजी
जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक हिटलर असल्याचे पोस्टर्सही आंदोलकांनी हाती घेतले होते. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख ‘तडीपार’ असा केलेले फोटो हाती पकडले होते. सुरक्षित शिक्षण हा आमचा अधिकार असल्याचे पोस्टर्स विद्यार्थ्यांनी दाखवले. या आंदोलनात विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या हे विशेष.
5 वर्षांपूर्वी -
'मग मुख्यमंत्री कशाला झालात; वडिलांची इच्छा पूर्ण करायला?'
राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळविले त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर राहावं लागलं. विरोधी पक्षातील भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी झालात का? असा सवाल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात सत्तांतर झाल्याने कोरेगाव भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता: प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भीमा-कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर, तेथे जमलेल्या विविध संघटनांशी वार्तालाप केला. याठिकाणी आज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सभाही घेतली जाणार असून सर्वच अनुयायांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मात्र, विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव भीमा : विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
आज सकाळपासून राज्यभरातून हजारो संख्येने भाविक याठिकाणी येत आहेत. उत्साहाचे वातावरण येथे असून, नागरिकांकडून रांगेत येऊन विजयस्तंभाला अभिवादन करण्यात येत आहे. हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस व जिल्हाप्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी इंटरनेट वापराला अडचण येते. तेव्हा नागरिकांना तत्काळ संपर्क साधता यावा, यासाठी खास “इमर्जन्सी कम्युनिकेशन प्लॅन’ची व्यवस्था जिल्हाधिकारी प्रशासनाने केली आहे. तसेच, पोलिस व अन्य सेवांसाठी खास हॉटलाइनचीही व्यवस्थाही केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांनी आता माजी मुख्यमंत्र्यांना धीर द्यायला हवा: रुपाली चाकणकर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यात सत्तापालट झाल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमृता फडणवीस यांनी वारंवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना, ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’ अशी घणाघाती टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता भानावर या: रुपाली पाटील-ठोंबरे
अमृता फडणवीस यांनी ‘ठाकरे; आडनावाचा उच्चार करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्ष केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेने सुद्धा सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. परंतु, आता शिवसेना आणि राष्ट्र्वादीने यांना प्रतिउत्तर दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील माजी नगरसेवक रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील अमृता फडणवीस यांना लक्ष करत बोचरी टीका केली आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट देखील टाकली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोहिते-पाटलांचा भाजपाला धक्का; पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, बुधवारी पुण्यात होणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. राज्यातील सत्तास्थापनेनंतर दोन्ही नेते पुण्यातील व्यासपीठावर पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याने सर्वांचंच लक्ष लागून होतं. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे पहिल्यांदाच मांजरी येथील ‘व्हीएसआय’ला येत असल्याने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत ते कोणती भूमिका घेणार, यावर चर्चा रंगली होती.
5 वर्षांपूर्वी -
अहिल्यादेवी होळकर उद्यानातील दीड एकर जागेवर मुलांना हक्काचं मैदान; मनसे तयारी सुरु
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे यांनी त्रज, संतोषनगर, दत्तनगर, मोरे बाग भागातील मुलांसाठी हक्काचे मैदान मिळाले यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून, त्यावर त्यांचे विशेष लक्ष देखील आहे. नगरसेवक वसंत मोरे यांचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांच्याबाबतीत चांगलाच बोलबाला आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेक विकास कामं वेळेत पूर्ण करून स्वतःची वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी
हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आधारकार्ड मतदानासाठी चालतं पण नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी नाही? राज ठाकरे
सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या जंगी सभा गाजवणाऱ्या अमोल मिटकरींची विधानपरिषदेवर वर्णी लागणार; अजितदादांचे संकेत
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानपरिषद ते विविध महामंडळांची तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र, त्यात राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांची विधानपरिषेदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे, कारण तसे थेट संकेत स्वतः अजित पवारांनी दिल्याने मार्ग सुकर असल्याचं म्हटलं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
“हैदराबादमध्ये खरी शिवशाही, जागेवर फैसला”: अभिनेते प्रवीण तरडे
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
कात्रज-कोंढवा परिसराच्या पाणीप्रश्नावरून मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा पुढाकार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज आणि कोंढवा परिसरातील पाणीप्रश्न सुरळीत व्हावा यासाठी महापालिका दरबारी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु केला आहे. कात्रज आणि कोंढवा परिसरात सामान्य लोकांना पाणीप्रश्नावरून अनेक समस्या आहेत त्यासंबंधित तोडगा काढण्यासाठी नगरसेवक वसंत मोरे यांनी अतिरिक्त आयुक्त गोयल यांना भेटून लेखी निवेदन दिले.
5 वर्षांपूर्वी -
स्वखर्चातून मतदाराची कामं करणारे मनसे नगरसेवक वसंत मोरे आणि पक्षवाढीची तळमळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे त्यांच्या मतदारसंघात कार्यसम्राट नगरसेवक म्हणून प्रसिद्ध असले तरी अनेक कामं त्यांनी स्वखर्चाने केली आहेत याची अनेकांना माहिती नसावी. पुणे महानगरपालिकेत अभ्यासू नगरसेवक म्हणून ज्ञात असलेले नगरसेवक म्हणजे वसंत मोरे असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सरचिटणीस पदावर असले तरी वसंत मोरे यांचं पक्षाप्रतीचं कार्य हे पुण्यातील नेते पदावर बसलेल्यांना देखील जमत नसावं असंच एकूण चित्र आहे. पुण्यातील नेते पदावरील मंडळी स्वपक्षाच्या वाढीसाठी जमिनीवर काय करता येईल यापेक्षा समाज माध्यमांवर इतर पक्षातील मापं काढण्यात व्यस्त दिसतात अशी चर्चा सध्या पुण्याच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी