महत्वाच्या बातम्या
-
पुण्यात माथेफिरूंकडून पुन्हा ७ दुचाकी गाड्या पेटवून देण्याचा प्रकार घडला आहे
रात्री अपरात्री गाड्या पेटवण्याचे प्रकार हे पुणेकरांना नित्त्याचे अनुभव झाले आहेत. यापूर्वी देखील असेच प्रकार काही गावगुंडांनी आणि माथेफिरूंनी केला आहेत, ज्यामध्ये पुणेकरांच्या मालमत्तेचे नाहक नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात पोलिसांना देखील अशा अनेक प्रकरणात कोणताही सुगावा लागत नसल्याने पुणेकर देखील हवालदिल झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
मंत्री सदाभाऊ खोत आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं विळा-भोपळ्याचं नातं महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मंत्री सदाभाऊ खोत यांना शहं देण्याचे प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केले जातात. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना आढावा बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
6 वर्षांपूर्वी -
जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड; आशा बुचके समर्थक शिवसैनिकांचे सामुहिक राजीनामे
पुणे जिल्हात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांच्या टीमने दिलेल्या अहवालानंतर आणि शिवाजी आढळराव-पाटील यांच्या दबावाखाली शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेडपी सदस्य आशा बुचके यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. जुन्नर विधानसभा क्षेत्रात अमोल कोल्हे यांना तब्बल ४० हजार मतांची आघाडी मिळाली होती तसेच विद्यमान आमदार शरद सोनावणे दे कुचकामी ठरले होते. परिणामी शिवसेनेतील दिग्गज खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांचा मानहानीकारक पराभव झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशी करा: मुख्यमंत्र्यांचे आदेश
पुण्यातील कोंढवा परिसरात सुरक्षा भिंत कोसळून दुर्दैवी अपघात घडला आहे. सदर घटनेत तब्बल १५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या संतापजनक घटनेला नक्की जबाबदार कोण यावरुन मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रसार माध्यमांनी देखील या विषयाला अनुसरून सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मी विधानसभा निवडणूक लढणार, हाकाळपट्टीनंतरही आशा बुचकेंचा ठाम निर्धार
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुण्यातील शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत आशा बुचकेंनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळेच आढळराव पाटलांचा पराभव झाला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराज फेम अमोल कोल्हे यांच्या भाषणाला नरेंद्र मोदींनी दिली दाद
शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांना पराभूत करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या शिरूर मतदार संघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक संभाजी फेम अमोल कोल्हे यांचा उल्लेख करत नरेंद्र मोदींनी त्याच्या लोकसभेतील पहिल्या आकर्षित भाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भिडेगुरूजी व शिवप्रतिष्ठानला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास पोलिसांकडून बंदी
संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. पालखी सोहळ्यात कुणी देखील घुसू नये आणि शिस्तीचं पालन व्हावं अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोरून चालण्यास यावेळी परवानगी देण्यात आलेली नाही. पुणे पोलिसांनी ही परवानगी स्पष्ट नाकारली आहे. पालखीच्या पाठीमागून संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते चालू शकतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र समोरून चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. मूल नगर परिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार शिल्पा रामटेके यांचा काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी एकूण १७६ मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप
लोकसभेत युती केल्यानंतर आगामी विधानसभेसाठी देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून एकत्र लढण्याचे निश्चित झाले आहे, परंतु विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून आत्ताच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावरून सुरु असणाऱ्या वादामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जागा वाटपा संदर्भात केलेल्या वक्तव्याने शिवसेना नेत्यांची चिंता वाढणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: हेल्मेट सक्तीतून पुणेकरांकडून मोठा दंड वसूल केल्यावर मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
यावर्षी १ जानेवारीपासून पुण्यात पोलिसांकडून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी निदर्शनं आणो कोर्टकचेऱ्या देखील झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या कालावधीत पुणे वाहतूक पोलिसांनी पूणेकरांकडून रग्गड दंड देखील वसूल केला. मात्र विधानसभा निवडणूक केवळ ३-४ महिन्यांवर आल्याने या विषयाला अनुसरून पुणेरकरांचा रोष सहन करावा लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी अखेर हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस आघाडीबरोबर येण्याची वंचितची मानसिकता नाही: अजित पवार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र घेत भारतीय जनता पक्षाच्या युतीला शह देण्याचा चंग कॉंग्रेस आघाडीने बांधला आहे. त्यादृष्टीने कॉंग्रेस आणि एनसीपीने इतर पक्षांशी आघाडी बाबत चर्चा सुरु केल्या आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीची कॉंग्रेस आघाडी बरोबर येण्याची मानसिकता नसल्याची माहिती एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत 'तो' निर्णय झाल्यास भाजप कार्यकर्ते गळफास लावून घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडणार आहे. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकडे वर्ग केले आहे असा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. दरम्यान आज होणा-या मुंबई येथील बैठकीत बारामतीचे पाणी जैसे थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आणि तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते शिवाजी चौक सांगोला येथे गळफास लावून घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत पाकिस्तानचं पाणी अडवण्याच्या धमक्या देऊन बारामतीचं पाणी बंद?
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा दुर्लक्षित करून भाजपचे सर्वच नेते मंडळी भाषणात केवळ पाकिस्तानवर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर भाषणात थेट पाकिस्तानचं पाणी रोखण्याची भाषा केली होती. भारतातुन वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणारे आज बहुमताने केंद्रात सत्तेत येताच पाकिस्तनाला विसरले असून, देशातील सामान्य लोकांच्या तोंडाचे पाणी पळवण्याचे काम करत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणूक २०१९ : राज ठाकरेंच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. राज ठाकरे या दौऱ्याची सुरुवात पुण्यापासून केली असून आज ते गटअध्यक्ष आणि शाखाध्यक्षांच्या बैठका घेतील. राज्यातील विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील प्रयत्नशील आहे. यासाठी स्वत: राज ठाकरे मैदानात उतरले असून पक्षातील मरगळ झटकण्यासाठी ते कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत. पुण्यापाठोपाठ राज ठाकरे नाशिकचा देखील दौरा करणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
बारावी निकालात मुलींची बाजी, कोकण टॉप, सरासरी निकाल ८५.८८ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. विभागनिहाय आकडेवारीत कोकण अव्वल स्थानी आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्यातील एकूणच निकालाची टक्केवारी ८५.८८ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील.
6 वर्षांपूर्वी -
मावळ: पार्थ पवारांचा पदार्पणातच पराभव; शिवसेनेच्या श्रीरंग बाराणेंकडून धोबीपछाड!
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार थेट लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने या मतदार संघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना तगडी स्पर्धा होती. त्यात विरोधी उमेदवार थेट पवार घराण्यातील असल्याने मावळ लोकसभा मतदासंघ प्रसार माध्यमांसाठी मोठा चर्चेचा विषय झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
बारामतीत भाजप मातीत; सुप्रिया सुळे विजयी तर कांचल कुल यांचा पराभव
बारामती लोकसभा मतदारसंघावर विजय प्राप्त करण्याचं भाजप नेत्यांचं स्वप्न भंगलं असून या मतदारसंघात केवळ पवार कुटुंबीयच राज्य करतात हे पुन्हा सिद्ध झालं आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी मोठं मोठ्या रणनीती आखात होते आणि त्यावर लक्ष देखील ठेऊन होते.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी ईडीला घाबरुन औरंगजेबास मुजरा घातला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? ईडीला घाबरुन तुम्ही औरंगजेबास मुजरा घातला. अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला. ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
6 वर्षांपूर्वी -
जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा: शरद पवार
लोकसभा निवडणुकीत जातीसाठी नाही तर आपल्या मातीसाठी मतदान करा, असं म्हणत एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना साथ देण्याचं जाहीर आवाहन मतदाराला केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या या विधानातून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना देखील अप्रत्यक्षरित्या टोला हणाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुण्यातून मोहन जोशींना काॅंग्रेसकडून उमेदवारी
अखेर पुण्यातून काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स संपवत माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. काल रात्री उशिरा मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी नुकतेच पक्षात दाखल झालेले प्रवीण गायकवाड इच्छुक होते. मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही.
6 वर्षांपूर्वी