महत्वाच्या बातम्या
-
'पेट्रोल-डिझेलचे' भाव भडकले आणि नागरिकांची 'माथी' सुद्धा
देशाच्या आर्थिक वर्षाची सुरवात झाली ती पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आणि सकाळी घराबाहेर पडलेले नागरिक पेट्रोलपंपवर पेट्रोल-डिझेलचे भडकले दर पाहून संतप्त प्रतिक्रिया देताना पहायला मिळत आहेत. काही जण तर नरेंद्र मोदींच्या निवडणुकीतील आश्वासनांचा उजाळा देत, हेच का ते ‘अच्छे दिन’ असा संतप्त प्रश्न विचारात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय महामार्गावर 'राष्ट्रीय नागरिकांचा' खिसा रिकामा
राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. तर वांद्रे – वरळी सी लिंकच्या टोलमध्ये थेट दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मी ४ वेळा मुख्यमंत्री झालो, पण 'चाय पे खर्चा' इतका ? शरद पवार
मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा विराजमान झालो, पण मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानावर इतका खर्च कधीच आला नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच 'चलो मुंबई', रेल्वे मंत्रालयाकडून ३ विशेष ट्रेन
सध्या निवडणुकांचं वातावरण देशभरात आणि राज्यात तापू लागलं आहे. त्यामुळेच ६ एप्रिल हे भाजपच्या स्थापन दिवसाचं कारण घेऊन भाजप मुंबईमध्ये शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीच मराठवाड्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
१ मे पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय अखेर रद्द
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अखेर १ मे पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय रद्द केला आहे. हा निर्णय घेतल्यापासून सर्वच थरातून टीका होत होती आणि अखेर राज्य सरकारला नमतं घ्यावं लागलं.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पण 'मंत्री व श्रीमंतांची' कर्ज सेटल
महाराष्ट्राचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच तब्बल ७६ कोटींचं कर्ज केवळ २५ कोटीत सेटल करून बँकांनी स्वतःच दिलदार होत, तब्बल ५१ कोटी ४० लाखाचा तोटा सहन केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नो लोकपाल, नो मोदी', घोषणांनी रामलीला मैदान दुमदुमले
अण्णांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे तरी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. आज नो लोकपाल, नो मोदी’, घोषणांनी संपूर्ण रामलीला मैदान दुमदुमले. रामलीला मैदानावर हजारो शेतकरी आणि अण्णांचे समर्थक मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. आज अण्णांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
7 वर्षांपूर्वी -
संभाजी भिडेंना अटक करा, प्रकाश आंबेडकरांचा आज मुंबईत एल्गार
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे म्हणजे भिडे गुरुजी यांना अटक करण्यात यावी म्हणून आणि राज्य सरकार संभाजी भिडेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत अखेर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात उंदीर घोटाळा, 'उंदीर मामा' मेले पण सरकारी 'भाचे' अखेर मोकाट ?
महाराष्ट्राच्या मंत्रालयात झालेल्या उंदीर घोटाळ्यामुळे सरकारच चांगलच हसू झालं असून, हा घोटाळा, त्याचा दर्जा आणि बाहेर आलेली स्पष्टीकरणं बघून महाराष्ट्रातील जनतेवर केवळ ‘उंदीर मामा की जय’ बोलण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही.
7 वर्षांपूर्वी -
गडकरी पंतप्रधान व्हावे हीच संघाची इच्छा, असं कोण म्हणाल ? सविस्तर
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी यांचे फेकू सरकार आले तर संपूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा भारतात कधीच निवडणूक होणार नाहीत.
7 वर्षांपूर्वी -
पक्षांतर रोखणारा कायदा करा, गडकरींच्या विधानाने विरोधकांमध्ये कुजबुज
एका खासगी वृत्तवाहिनीच्या सन्मान सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शहीद दिनापासून अण्णांच लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह आंदोलन
अखेर अण्णांनी आज रणशिंग फुंकले, २३ मार्च म्हणजे शहीद दिनाचे औचित्य साधून अण्णांच आज लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह आंदोलन सुरु आणि मोदीसरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
अंगणवाडी सेविकांवर मेस्मा कायदा लावण्याचा युती सरकारचा डाव उधळला
अंगणवाडी सेविकांचं काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याचे कारण पुढे करून त्यांचा संप उधळून लावण्याच्या दृष्टीकोनातून महिला आणि बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याच्या कचाट्यात आणले होते.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी मुंबई संदर्भातलं वक्तव्य आणि नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय
राज ठाकरेंनी मुंबई संदर्भातलं वक्तव्य आणि नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. यात मोदी मुंबई आणि पुणे संदर्भात वक्तव्य करतानाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनत आहे.
7 वर्षांपूर्वी -
अखेर राज ठाकरेंच 'ते' व्यंगचित्र खरं ठरल, महाराष्ट्र दहशदवाद्यांचा तळ बनतोय
महाराष्ट्र बांगलादेशी दहशदवाद्यांचा तळ बनत चालला असल्याचे काहीसे चित्र आहे. पुण्यातील एका लष्करी बांधकामाच्या साईटवरून एटीएसने पुणे मोड्युलचा भाग असणाऱ्या राज मंडळ ह्या ३१ वर्षाच्या तरुणाला अटक केली असून तो या लष्करी साईटवर पर्यवेक्षक म्हणून कामाला होता.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीकडून मनसेचं समर्थन
राष्ट्रवादीकडून मनसेचं समर्थन
7 वर्षांपूर्वी -
पुणे-सातारा रस्त्याच काम रखडविणाऱ्या 'रिलायन्सला' टोलवाढीची भेट
पुणे (देहूरोड)- सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं केवळ अडीज वर्षाचं काम तब्बल साडेसात वर्ष रखडलेलं असताना देखील उलट सरकारच त्यांना वेळोवेळी मुदतवाढ करून देत होती आणि आता त्या दिरंगाईचा सरकारी नजराणा म्हणून ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुबईनंतर किसानसभा मोर्चा दिल्लीकडे, देशभर जेलभरो करणार
मुंबईतील किसानमोर्चा यशस्वी झाल्यानंतर आता किसानमोर्चा दिल्लीच्या दिशेने नव्या आंदोलनाचा एल्गार करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी देशभर करोडो शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकरांनीच महाराष्ट्रातील वातावरण पेटवलं : संभाजी भिडे
पुण्यातील कोरेगाव-भीमा दंगलीचा फायदा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि मतांसाठी करण्यात आल्याचा आरोप संभाजी भिडेंनी पत्रकार परिषद घेऊन केला.
7 वर्षांपूर्वी -
मराठी नववर्षाच्या 'चिंतामणीरावांकडून' महाराष्ट्राला शुभेच्छा
संपूर्ण राज्यात मराठी नववर्षाचा उत्साह संचारलेला पाहायला मिळत आहेत, त्यात आपल्या सर्व मराठी तरुणींचा आणि तरुणांचा उत्साह भरभरून पाहावयास मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी