राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन

पिंपरी चिंचवड, 04 जुलै : माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
दत्ता साने हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक अशी त्यांची राजकारणात ओळख होती. दत्ता साने यांच्या अशा जाण्यामुळे राष्ट्रवादीत मोठी शोककळा पसरली आहे. साने यांच्या निधनाबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहीती देतांनाच दुःख व्यक्त केलं.
चिखली येथून ते तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदाची धुरा सांभाळताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असायचे. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी चक्क महानगर पालिकेच्या मुख्य दालनात कचरा आणून टाकला होता. ते संबंध लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय समजले जात. या घटनेमुळे साने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
News English Summary: Former Leader of Opposition, NCP corporator Datta Sane has died of a heart attack. Datta Sane is undergoing treatment for corona infection. He died at a private hospital in Chinchwad around 5 am.
News English Title: Pimpari Chinchwad NCP Corporator Datta Sane Dies Due To Corona News Latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं