पुणे: मोदींनी भाजपच्या खासदार व आमदारांच्या ५ वर्षातील कामांचा हिशेबच दिला नाही

पुणे: पंतप्रधान नरेंद्र यांची काल पुण्यात विधानसभेच्या निमित्ताने सभा पार पडली. वास्तविक प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोदींच्या दिशेने असले तरी सभेत पुढचा काही भाग सोडल्यास रिकाम्या खुर्च्यांची खच मात्र सहज नजरेस पडत होता. सभेला संबोधित करताना मोदींनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं. त्यात ते असं म्हणाले की, ‘सरकार येऊन आता कुठे ५ महिने झाले आहे आणि खूप काही करायचं आहे’, यावरून मोदींना केंद्रात भाजपचं सरकार मागील सलग साडेपाच वर्षांपासून असल्याचा विसर पडल्याचं दिसून आलं.
विशेष म्हणजे मागील ५ वर्षात भाजपने पुण्यात कोणती विकासाची कामं केली याचा कोणताही हिसाब त्यांनी पुणेकरांना दिला नाही. त्यात भाजपच्या पुण्यातील खासदार आणि आमदारांची विकासाची कामं सांगावी असं काहीच नसल्याने मोदींनी ५ महिन्याचं सरकार असल्याचं सांगून पळवाट काढल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे कलम ३७० विषयावर मोदी बोलणार आणि त्यासाठी मोदी-मोदी-मोदी असं ओरडून प्रसार माध्यमांवर वातावरण निर्मिती करणारी इव्हेन्ट टीम आधीच सज्ज करण्यात आली होती. असाच प्रयोग २०१४ भाजपने केला होता आणि त्यालाच नेमकी पुणेकर मंडळी भुलली होती. मात्र प्रत्यक्षात सरकार आल्यावर पुण्यात मागील ५ वर्ष जैसे थे परिस्थिती आहे. किंबहुना शहरात अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची पूर्वी पेक्षा अधिक वाईट स्थिती असल्याचं अनेक पुणेकर सांगतात.
मोदी सभेत म्हणाले की, मागील ७० वर्षांपासून ‘एक देश, एक संविधाना’च्या आड ३७० कलम येत होतं. हे कलम काढून टाकण्याच्या गप्पा खूप झाल्या. पण कृती कोणी केली नाही, असे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणताच मोदी मोदीचा जयघोष केला. लोकांचा उत्साह पाहून मोदींनी आपले भाषण थांबवत पुणेकरांना अभिवादन केले. पुण्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
३७० कलम काढून टाकल्याने देश एकसंध झाल्याचे देखील ते यावेळी म्हणाले, तसेच हे कलम काढून टाकणे जम्मू काश्मीर, लढाखच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक होते असेही ते म्हणाले. मोदींचे आगमन होताच भव्य हाराच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मोबाईलचा टॉर्च लावून उपस्थित नागरिकांनी मोदींना अभिवादन केले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं