चंद्रकांत दादांना गणेश मंडळाचे अध्यक्ष व्हावं, या आव्हानानंतर रुपाली पाटील यांना नोटीस

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीवर मनसेने यापूर्वीच हुकूमशाहीचा आरोप केला आहे. दडपशाही आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत विरोधकांना जेरीस आणण्याची रणनीती आता राजकारणात नवी राहिलेली नाही. तसाच काहीसा प्रकार पुन्हा पुण्यात घडला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका आणि ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे यांना पुणे पोलिसांनी गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान पोलिसांनी रुपाली पाटील यांना दिलेल्या आदेशामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त केला आहे. आज बाप्पाचं विसर्जन होत असताना रुपाली पाटील यांना १२ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत झोन एकच्या हद्दीत राहण्यास आणि प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वास्तविक कोणताही गंभीर कारण नसताना पुणे पोलिसांनी हे पाऊल उचलल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून विषयाचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा, रुपाली पाटील ठोंबरे यांच्याविरोधात हिंजवडी, खडक, बिबवेवाडी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आणि त्या गुन्ह्यांचा दाखला देत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे आणि पोलिसांनी त्यांच्या नावाने नोटीसही जारी केली आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे.
मात्र सदर कारवाई केवळ राजकीय हेतूने केली गेल्याचा आरोप करताना रुपाली पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कारण काहीदिवसांपूर्वी रुपाली पाटली यांनी डीजे प्रकरणावरुन चंद्रकांत दादांना गणेश मंडळाचे अध्यक्ष व्हावं, असं थेट आव्हान केलं होते. त्यानंतर पुण्याचे अघोषित सर्वेसेवा होण्याची इच्छा असलेल्या पालकमंत्र्यांचा अहंकार दुखावला गेल्याने त्यांच्या इशाऱ्यावरून सूडबुद्धीने ही करावी केली गेल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत रुपाली पाटील कसाब विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता असल्याने त्यांना अशा विषयात गुंतवलं जात असल्याचं कार्यकर्ते बोलत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं