आधी पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; जागावाटप बाजूला राहू द्या: छगन भुजबळ

पुणे: मागील ३ दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरातील सर्वच भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.
दरम्यान पुणे आणि बारामतीमध्ये पूरपरिस्थिती असताना मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जागावाटपाच्या चर्चांसाठी दिल्लीला गेल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली असताना, आम्ही रात्रीपासून पूरपरिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्ली पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी पुणे आणि बारामतीमधील पूरस्थितीच्या आढाव्याची माहिती दिली.
पुरानं आतापर्यंत ११ जणांचा बळी घेतला आहे. पुण्यातील या परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तिकीटवाटपाला उशीर झाला तरी चालेल. आधी पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.
पुण्यात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले. वाहनेही वाहून गेली. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून, चार जण अद्याप बेपत्ता आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पुण्यातील पूरपरिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तिकीटवाटपाला दोन दिवस उशीर झाला तरी चालेल, पण आधी पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या. मदतकार्याला उशीर झालेला चालणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं