कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकाच्या कुटुबीयांची पवारांनी भेट घेतली

पिंपरी चिंचवड, ४ जुलै : माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं २५ जून रोजी निधन झालं. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यादिवशी पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
दत्ता साने हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक अशी त्यांची राजकारणात ओळख होती. चिखली येथून ते तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदाची धुरा सांभाळताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असायचे. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी चक्क महानगर पालिकेच्या मुख्य दालनात कचरा आणून टाकला होता. ते संबंध लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय समजले जात. या घटनेमुळे साने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
दरम्यान, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दत्ता साने यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. तसेच घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे. साने हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते होते. अनेकदा त्यांना दुसऱ्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते.
News English Summary: Today, NCP’s Sarvesarva Sharad Pawar visited Datta Sane’s family and consoled them. The family members were in tears at this time. The family has also raised the possibility of an ambush. Sane was a staunch NCP activist.
News English Title: Today NCP Chief Sharad Pawar visited Datta Sane family and consoled them News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं