महत्वाच्या बातम्या
-
केंद्रीय जोर लावूनही ठाकरे सरकार पडत नसल्याने विरोधी पक्षाच्या तोंडास फेस | शिवसेनेचं टीकास्त्र
महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी पक्ष भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात सध्या चांगलीच खडाजंगी सुरू आहे. सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले आहेत. आता शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून याविषयावर भाष्य केले आहे. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
'मोदी नामा'ची जादू उतरली | 2024 चा जय-पराजय हातचलाखीच्या प्रयोगावर ठरेल - शिवसेनेचे टीकास्त्र
2024 चे लक्ष्य वगैरे ठीक आहे, मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील, असा सल्ला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांना दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आठवा महिना लागला, पाळणा कधी हालणार? | १२ आमदार नियुक्तीवरून शिवसेनेचा खोचक सवाल
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचा प्रश्नावरून सध्या चांगलेच राजकारण तापू लागले आहे. नुकतेच न्यायालयाने कान टोचल्यानंतर राज्यपालांनी सरकारकडून आग्रह धरला जात नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांचे वय झाले असल्याचा टोला लगावला होता. या प्रकरणात आता शिवसेनेनेही राज्यपालांवर बोचरा आणि उपरोधिक निशाणा साधला आहे. सरकारने 12 नावांची शिफारस करून आता आठवा महिना लागला. मात्र राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? हे राजभवनातील सुईणीने एकदा स्पष्ट करावे, असा टोला शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
50 टक्केच्या मर्यादेवर न बोलता भाजपातील मराठ्यांनी अवसानघात केला | शिवसेनेचा घणाघाती आरोप
50 टक्क्यांच्या मर्यादेचा तिढा कायम ठेवून केंद्र व भाजप आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करीत आहे, पण मराठा समाज सर्वकाही जाणतो. संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील भाजपचे ‘मऱ्हाटा’ पुढारी हे मौन बाळगून बसले होते की, त्यांची तोंडे बंद केली होती? स्वतः कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना मराठा आरक्षणावर बोलण्यापासून रोखले होते, पण छत्रपतींचेच वंशज ते! ते बोलायला उभे राहिलेच, पण भाजपातील इतर मराठय़ांचे काय? त्यांनी तर तसा अवसानघातच केला, अशी टीका शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय कराडांना मंत्रिपद हा पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव - शिवसेना
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे भगिनींना डावलल्याचा सूर समर्थकांतून व्यक्त होत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल दरवाढ | जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही ते तरी काढून घेऊ नका - शिवसेना
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने आधी इंधन दरकपातीचा ‘चमत्कार’ आणि निवडणुकीनंतर दरवाढीचा ‘नमस्कार’ जनतेला पुन्हा अनुभवायला मिळत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचा धुरळा खाली बसला आणि पेट्रोल–डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला. ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का? जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका, असा सल्ला शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात इंधन दरवाढ आणि निवडणुकांवर भाष्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली | प. बंगालची जनता कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही - शिवसेना
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. याचा अर्थ असा की, मोदी-शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत. प. बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. प. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला आणि कोरोना जिंकला. प. बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही, असा टोला शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लगावला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत वक्तव्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात वेळोवेळी राजीनामे मागता, आता देशात स्मशाने धगधगत असताना कुणाचा राजीनामा मागावा? - शिवसेना
कोरोना परिस्थिती नीट हाताळली नाही, असा कांगावा करीत महाराष्ट्राचे सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप पुढारी करीत असतात. खरं तर हाच न्याय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लावला तर काय होईल? याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा. देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले. त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार आहे. यावरच सर्वोच्च न्यायालयाने मोहर मारली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे गंभीर आहेत. त्याबद्दल आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देशातील कोरोना स्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? - शिवसेना
मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? असाच प्रश्न देशाची सध्याची भयावह स्थिती पाहिल्यावर पडतो, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची | संसदेत चर्चा व्हावी
आजच्या सामना अग्रलेखातून निवडणूक आयोगावर सडकून टीका करण्यात आली आहे. आसाम आणि प. बंगालातील घटनांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाल्या. लोकशाही परंपरेची चाड थोडी जरी शिल्लक असेल तर या सगळयावर संसदेत तरी चर्चा व्हावी, अशी मागणी सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सांगली-जळगावातील कार्यक्रम ही तर नांदी | यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील - शिवसेना
सांगलीत, जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील! असा सूचक इशारा शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात याबाबतचे वक्तव्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरणात केंद्राने सीबीआयला घुसवले | CBI'ने काय दिवे लावले? - शिवसेना
सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली. अंबानी स्फोटकं व हिरेन मृत्यू प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. “सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी उत्तम तपास केला, तरीही केंद्राने सीबीआयला घुसवले. त्या सीबीआयने तरी काय दिवे लावले? हात चोळत बसले,” असं म्हणत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर हल्ला केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टर ममतांना आणि दुखणं भाजपला | शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम बंगालच्या विधानसभेचं रण चांगलंच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांचे वार सुरु झालेत. अशातच सामना अग्रलेखातून ममतांना वाघिण संबोधत भाजपवर शरसंधान करण्यात आलं आहे. ममतांना प्लॅस्टर, भाजपला दुखणं, अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजपची नौका आणखीनच खोल पाण्यात गेली, असं सुचवत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि निवडणुका | दिल्लीश्वरांना दैवी शक्ती प्राप्त झाल्याने कोरोना त्यांना स्पर्श करीत नसेल
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळायलाच हवी असं सांगत ‘सद्यपरिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन? टाळता आला तर बघा’, असा अग्रलेखात म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
दरेकरांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, फडणवीसांना तरी समजला का? - शिवसेना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना करोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. नागरिकांकडून सूचनांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर ‘सरकारने लोकांमध्ये दहशतीचे वातावर निर्माण करू नये. जुलमी राजवटीसारखी कृती करू नये,’ अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली होती. दरेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब, कंगनासारख्यांना सुप्रीम कोर्टात झटपट न्याय मिळतो | मग....
अर्णव गोस्वामी, कंगना राणावत यांच्या सारख्यांना सर्वोच्च न्यायालयात झटपट न्याय मिळतो, मग लाखो मराठी सीमा बांधवांचा आक्रोश, त्यांनी सांडलेल्या रक्ताची वेदना सर्वोच्च न्यायालयास दिसत नाही का? सीमा वाद कोर्टात असताना कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन तेथे विधान भवन निर्माण केले. हा सुप्रीम कोर्टाचा अवमान नाही काय?,’ असा सवाल शिवसेनेनं सामना अग्रलेखातून केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील गुपिते गोस्वामीने फोडली | भाजप तांडव का करीत नाही? - शिवसेना
तांडव या वेब सीरिजविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल होण्याचं सत्रच सुरू झाल्याचं दिसत आहे. सीरिजमधील एका दृश्यावर आक्षेप घेत भारतीय जनता पक्षानं आक्षेप घेतला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी देशभरात दिग्दर्शक व निर्मात्याविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हेही दाखल केले. त्यामुळे या वादाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. याच वादाचा हवाला देत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला धारेवर धरलं आहे. अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भारतीय जनता पक्षाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही,” अशा शब्दात शिवसेनेनं आजच्या (२१ जानेवारी) सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे! | सेक्युलरवाद्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला चिमटा
राज्यात सध्या औरंगाबादचं नामंतरण करण्याच्या मुद्दयावर सत्ताधारी पक्षामध्येचं दोन मतप्रवाह असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने नामांतर करण्याचा विडा उचललाय तर कॉंग्रेस मात्र नामांतरण हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असे म्हणत या नामांतराच्या विरोधात आहे.काँग्रेसकडून नामांतर विरोधी सूर लावला जात असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून सेक्युलरवाद्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला चिमटा काढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी अध्यक्षपद घेण्यास होकार देताच रॉबर्ट वढेरांच्या घरी आयकर विभागाची धाड
राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुलुंडच्या तोतऱ्या पोपटाने ED ला काही नेत्यांचे पुरावे दिलेले | ते भाजपवासी होताच...
राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते. राहुल गांधींचे भय त्या शंभर पटीतले आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने खासदार राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.
4 वर्षांपूर्वी